नवी दिल्लीः कॉल रेकॉर्डिंग फीचर सर्वसामान्य झाले आहे. जर तुम्ही अँड्रॉयड स्मार्टफोनचा विचा करीत असाल तर हे खूपच सोपे आहे. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासून व्हाइस कॉल रेकॉर्ड करून हे फीचर इनबिल्ट देते. ज्या अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये फीचर नाही. ते गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अॅप्स आहेत. ज्यात व्हाइस कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा देते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुमची कॉल रेकॉर्डिंग होत असल्यास असं माहिती करून घ्या. वाचाः सर्वात आधी लक्ष ठेवायला हवे की, कोणीही तुमच्या मंजुरी शिवाय, कॉल रेकॉर्ड करणे ही एक चोरी आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे किंवा त्याच्या परवानगी विना रेकॉर्ड करणे हे कलम २१ च्या विरुद्ध आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या प्रायव्हसीला सन्मान देणे गरजेचे आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर संविधानचे कलम २ नुसार जीवनाचे मूलभूत अधिकारात प्रायव्हसी हे व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीची पर्सनल कॉल रेकॉर्डिंग करणे नियम मोडण्यासारखे आहे. वाचाः जर कोणी कोणाशी बोलत असताना त्याचा कॉल रेकॉर्ड करीत असेल तर ते चुकीचे आहे. कॉलवर बोलत असताना तुमचा कॉल कुणी रेकॉर्ड तर करीत नाही ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कुणाशी बोलत असताना काही सेंकद किंवा मिनिटात बीप सारखा आवाज आला तर समजून जा की, तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. वाचाः सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे की नाही, हे कसे ओळखायचे. व्हाइस कॉल सुरू किंवा मध्ये मध्ये बीपचा आाज येत असेल तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, हे समजून जा. दुसरी पद्धत म्हणजे जर तुम्ही कुणाला कॉल केल्यास त्याने तुमचा कॉल स्पीकरवर टाकल्यास समजून जा की, तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. स्पीकर ठेऊन व्हाइस कॉल रेकॉर्ड करणे सर्वात सोपे आहे. यात कॉल दरम्यान कोणताही रेकॉर्डर किंवा फोनच्या जवळ ठेऊन तुमचे फोनवरचे संभाषण रेकॉर्ड केले जाऊ शकते. जर तुम्ही कुणासोबत बोलत असाल आणि तुम्हाला आजुबाजुचा जास्त आवाज येत असेल तर कदाचित तुमचे बोलणे रेकॉर्ड होत आहे. आपला कॉल रेकॉर्ड होऊ नये यासाठी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. ऑनलाइन असे अनेक अॅप्स आहेत. ज्यात विना बीप साउंड मध्ये कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rt2t7B