मुंबई- बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेत्री नवरा याच्यासोबत अनेक दिवसांपासून लंडनला मुक्कामाला आहे. अतिशय व्यग्र असलेल्या कलाकारांपैकी प्रियांका एक आहे. असे असूनही तिने वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबियांसोबत होळी साजरी केली. त्याचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली प्रियांका सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहतेही फोटोंना भरभरून प्रतिसाद देत असतात. सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रियांकाने आपल्या सासू- सासरच्यांसोबत साजऱ्या केलेल्या रंगपंचमीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका, निक आणि त्याच्या आई-वडिलांनी पांढरे कपडे घातले आहेत. याशिवाय त्यांनी एकमेकांना रंगही लावला आहे. प्रियांकाच्या हातामध्ये एक मोठी पिचकारी असून तिने निकसोबत झक्कास पोझ दिली आहे. आपल्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत प्रियांकाने पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते, 'रंगांचा उत्सव असलेला होळीचा सण मला खूप आवडतो. सर्वजण आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत घरात राहून रंगांचा हा उत्सव साजरा करत असालातच अशी मला अपेक्षा आहे.' करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे लोकांनी आपल्या घरात राहूनच रंगांचा हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रियांकाने केले आहे. याच कारणामुळे प्रियांका आणि निकने त्यांच्या लंडनमधील घरी केलेल्या सेलिब्रेशनला अतिशय मोजक्या लोकांना बोलावले होते. प्रियांकाचे सिनेमे प्रियांका सध्या कियानू रीव्स याच्यासोबत 'मॅट्रिक्स-४', आणि किस प्रॅटसह 'काऊबॉय निंजा व्हायकिंग' या आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आता पुढच्या वर्षी प्रियांका एक हिंदी सिनेमात काम करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ugrWlZ