Full Width(True/False)

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अशी करा नोंदणी

मुंबई: सोनी टीव्हीवर दाखवला जाणारा रिअलिटी शो कौन बनेगाा करोडपती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचं होस्टिंग अमिताभ बच्चन करतात. त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावतो. त्यामुळे की काय हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी '' हा मराठी रिअलिटी शो सुरू करण्यात आला होता. जो खूप लोकप्रिय ठरला. प्रसिद्ध अभिनेता यांचं होस्टिंग असलेल्या या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मागच्या वर्षी करोना व्हायरसमुळे या रिअलिटीशोचं प्रसारण झालं नाही मात्र आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१९मध्ये वाहिनीनं 'कोण होणार करोडपती'चं प्रसारण केलं होतं. पण २०२० या वर्षात वैश्विक महामारीमुळे या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणं शक्य झालं नाही. पण आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' सुरू होणार आहे. ज्यात तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं. सोनी मराठीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डवरून याची माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं होस्टिंग सचिन खेडेकर करणार आहेत. मराठी प्रेक्षकांमध्ये सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. 'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह अॅपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OvNlYY