Full Width(True/False)

दमदार संवादांनी जिंकली मनं, बहुचर्चित 'चेहरे' चा टीझर पाहा

मुंबई- बॉलिवूडचे महानायक आणि अभिनेता यांचा आगामी चित्रपट '' चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणादेखील करण्यात आली आहे. हा चित्रपट ९ एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या ४५ सेकंदाच्या टीजरमध्ये आपल्याला अमिताभ, इम्रान आणि अनु कपूर यांचा आवाज ऐकू येतो. ते तिघेही त्यांच्या दृष्टिकोनातून गुन्हा, न्याय आणि इमानदारीबद्दल बोलताना दिसतात. या आगळ्या वेगळ्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता अजून वाढली आहे. चित्रपटाचा टीझर अभिनेत्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यात सुरुवातीला अनु कपूर यांचा आवाज ऐकू येतो. ते म्हणतात, 'असा एकही व्यक्ती या जगात नाही ज्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात कोणताही गुन्हा केला नाही.' त्यानंतर इम्रानचा आवाज येतो आणि तो म्हणतो, 'आजच्या दुनियेत इमानदार तो आहे, ज्याची बेईमानी पकडली गेली नाही आणि निर्दोष तो आहे, ज्याचा कोणताही गुन्हा पकडला गेला नाही.' टीझरच्या शेवटी अमिताभ त्यांच्या दमदार आवाजात या देशातील न्यायव्यवस्थेबद्दल बोलतात. ते म्हणतात, 'आपल्या न्यायालयांमध्ये न्याय नाही, निर्णय दिला जातो.' या तिघांच्या वाक्यांवरून हे स्पष्ट होत की हा चित्रपट तीन वेगवेगळ्या प्रवाहात वाहणाऱ्या म्हणजेच तीन वेगवेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींवर आधारित आहे. या चित्रपटातील कलाकारांची यादी थोडी मोठी आहे. चित्रपटात रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. रुमी जाफरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे पोस्टर्स यापूर्वी प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्रपटात क्रिस्टल डिसूझासह रिया चक्रवर्तीही होती. परंतु, चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमध्ये तिला दाखवण्यात आलेलं नाही. इतकंच नाही तर चित्रपटाच्या कलाकारांच्या नावांच्या यादीतही तिचं नाव दिसून येत नाही. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे, हे नक्की.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OleVYS