Full Width(True/False)

आता तुम्ही देखील बनू शकता 'द कपिल शर्मा शो' चा भाग, करावं लागेल 'हे' काम

मुंबई- छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेला कार्यक्रम 'द शो' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या या कार्यक्रमाने काही वेळासाठी त्यांची रजा घेतली होती. परंतु, पुन्हा एकदा नव्या जोमाने, नवीन कल्पना आणि नवनवीन पात्र घेऊन हा कार्यक्रम प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयार झाला आहे. परंतु, आता कार्यक्रमात जुन्या चेहऱ्यांसोबत काही नवीन कलाकारही दिसणार आहेत. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नवीन कलाकारांना संधी देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीही या कार्यक्रमाचा भाग होऊ शकते. जर तुम्ही लेखक आहात आणि तुम्ही तुमच्या लेखणीतून प्रेक्षकांना हसवण्याचा ताकद ठेवता,तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. फक्त लेखकच नाही तर तुम्ही एक चांगले अभिनेते आहात आणि तुमच्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवू शकता तर तुम्हीही कार्यक्रमाचा भाग होऊ शकता. च्या निर्मात्यांनी कार्यक्रमात नवीन कलाकारांना संधी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं, 'जिथे 'द कपिल शर्मा शो' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिथे आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा विचार करत आहोत. नवीन अभिनेते आणि नवीन टीमला कार्यक्रमात घेणं हे त्याचाच एक भाग आहे.' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची सर्व माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याची विनंती केली गेली आहे. कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडणामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी प्रचंड घसरला होता. परंतु, तसं असतानाही पुन्हा एकदा सलमान खानच्या मदतीने कपिलने कार्यक्रमाला नं. एकचा दर्जा मिळवून दिला. हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PpUudr