मुंबई: साधारण २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ' हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. यातील आणि या जोडीमधील केमिस्ट्रीचं कौतुक झालं होतं. आता २० वर्षांनंतर चित्रपटाची आठवण काढण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे अशी चर्चा रंगू लागली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या संहितेवर काम सुरु आहे असं कळतंय. सिक्वेलमध्ये सनी आणि अमीषा दोघंसुद्धा असतील असं बोललं जातंय. पण सिनेमातला त्या दोघांचा मुलगा जीतेला केंद्रभागी ठेवून दुसऱ्या भागाची कथा लिहिली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. आता हा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर कशा प्रकारे कमाई करतो हे बघणं औत्सुक्याचं असेल. गदर चित्रपटात सनी आणि अमीषा यांच्या मुलाची भूमिका साकारलेला अभिनेता देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार असल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lpyJ9J