Full Width(True/False)

अभिनेत्यावर खोटे आरोप करणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला तुरुंगवास

मुंबई- 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला पाकिस्तानी अभिनेता आणि गायक याच्यावर पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री मीशा शफीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावर पाकिस्तानी न्यायालयाने सुनावणी केली असून अलीची यात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मीशाने लावलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं होतं. यानंतर अलीने न्यायालयात मीशाविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. त्याने मीशाकडून त्याची सामाजिक प्रतिमा बिघडवल्याबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्या खटल्याच्या सुनावणीमध्ये मीशाला पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मीशाने न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मीशाने #MeToo अभियानादरम्यान अलीवर तिचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. मीशाचा आरोप होता की, अलीने त्याच्या घरी असलेल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तिच्यासोबत गैरव्यवहार केला होता. त्याने परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोपदेखील तिने केला होता. या प्रकरणावर पाकिस्तानी न्यायालयाने अलीची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर अलीने मीशावर अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, मीशाच्या अशा वागण्यामुळे त्याची समाजातील प्रतिमा मलिन तर झालीच शिवाय कामावरही त्याचा मोठा परिणाम दिसून आला. मानहानीच्या तक्रारीची सुनावणी करताना पाकिस्तानी कायदे सुव्यवस्था मंडळाने अलीला सामाजिक स्तरावर अपमानित केल्याच्या आरोपांवर मीशाला ही शिक्षा सुनावली आहे. मीशाने या निर्णयाला आव्हान देण्याचं ठरवलं आहे. अलीने नुकतंच एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, झालेल्या या संपूर्ण प्रकाराने त्याची खूप बदनामी झाली. घटनेवर दुःख व्यक्त करत त्याने सर्व आरोपांचं खंडन केलं. या सर्व प्रकारचा त्याच्या कुटुंबाला मानसिक मनस्ताप सहन करावा लागला असल्याचंही तो यावेळी म्हणाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bI6orU