मुंबई: टीव्ही अभिनेत्री बिग बॉस १४ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर खूप खूश आहे. मागच्या काही दिवसांत रुबीना तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत पार्टी करताना दिसली होती. त्यानंतर आता रुबीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिला एक व्यक्ती आशीर्वाद देताना दिसत आहे. रुबीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे. रुबीनानं कलर्स टीव्ही वरील मालिका 'शक्ती- अस्तित्त्व के अहसास की'मध्ये तृतियपंथी सूनेची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. तेव्हा पासून रुबीनाचं तृतियपंथी समाजाशी एक खास नातं आहे. त्यामुळे आता बिग बॉस विनर झाल्यानंतर तिनं या समाजातील 'गुरू माँ'चा आशीर्वाद घेतला. 'गुरू माँ' यांना घरी बोलवून सर्व मान सन्मासह रुबीनानं त्यांना भेटवस्तू देत त्यांचा आशीर्वाद घेतला. रुबीनानं याचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, गुरु माँ आणि त्याच्या सहकारी रुबीनासोबत चहा-नाश्ता करताना दिसत आहेत. त्यानंतर रुबीना त्यांना भेटवस्तू देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. हा व्हिडीओ शेअर करताना रुबीनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, अन्नूजी मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. त्या तृतियपंथी समाजाच्या गुरू माँ आहेत आणि माझी मालिका 'शक्ती'मध्येही त्यांनी काम केलं आहे. त्यांना खास करून अभिनवला भेटायचं होतं. त्या त्याचा खूप आदर करतात. रुबीना आणि अभिनवची जोडी मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या घटस्फोटाचीही चर्चा झाली. त्यांच्याकडे केवळ ६ महिन्याचा वेळ होता. पण नशीबानं त्यांना साथ दिली आणि बिग बॉसच्या घरात आल्यावर अभिनव-रुबीनाचं नातं आणखीच मजबूत झालं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/300kcXY