Full Width(True/False)

वडिलांची निर्मिती संस्था असताना आलियानं का सुरू केली स्वत:ची कंपनी?

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची पाऊले आता निर्मिती क्षेत्राकडे वळली आहेत. तिने अभिनयासोबत चित्रपटांची निर्मिती करण्याचं देखील ठरवलं आहे. त्यासाठी तिने एक निर्मिती संस्था सुरू केली आहे. इटरनल सनशाइन असं आलियाच्या कंपनीचं नाव असून तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर केली. तिच्या निर्मिती संस्थेचं ऑफिस अत्यंत सुंदर असून तिने त्याचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलियाच्या या निर्णयाचं सगळ्यांकडून कौतुक होत असतांनाच अनेकांनी तिच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आलियाने नवीन निर्मिती संस्थेबाबत सोशल मीडियावर सांगितल्यावर तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. युजर्सना पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आलियाच्या वडिलांची महेश भट्ट यांची स्वतःची निर्मिती संस्था असताना तिने वेगळी संस्था कशासाठी स्थापन केली? असं करण्यामागचं कारण प्रेक्षकांना कळालेलं नाही. याशिवाय, आलियाच्या आधीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या स्वतःच्या निर्मिती संस्था सुरू केल्या. परंतु, त्या जास्त चित्रपट बनवू शकलेल्या नाहीत. शिल्पा शेट्टी, दिया मिर्जा, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींनी चित्रपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेत निर्मिती संस्थांची स्थापना केली. परंतु, त्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यात अयशस्वी ठरल्या. त्यातील अभिनेत्री अनुष्का शर्माने स्थापन केलेल्या निर्मिती संस्थेने अनेक हिट चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. तिने स्वतःदेखील निर्माता म्हणून चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आलिया लवकरच 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून आणि कलाकारांकडून कौतुक होत आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांची निर्मिती आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b8tRSG