मुंबई- काही दिवसांपूर्वी '' या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मारहाण झाली होती. चित्रीकरण संपवून घरी जात असताना तिला काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली होती. त्या प्रसंगाची दखल घेत मुंबई पोलिसांनी तिची तात्काळ मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. तसा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. गंगाने सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. गंगा 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमात झळकली होती. तिथून तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि आज ती अभिनय क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे. गंगाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं, 'आज हा व्हिडियो शेअर करण्याचं खास कारण आहे. आता मी थोडी बरी आहे. जो काही प्रसंग घडला त्यातून मी सावरले आहे. पण, या व्हिडीओच्या माध्यमातून मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. सगळ्यात प्रथम मुंबई पोलीस, मुंबई आयुक्त यांचे अगदी मनापासून आभार मानते . त्यांनीच मला प्रथम मदतीचा हात दिला. या गोष्टीसाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी असेन, त्यानंतर दुसरे आभार पंतनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांचे. त्यांनीदेखील एकही सेकंद व्यर्थ न घालवता मला मदत केली आणि तिसरे आभार तुम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकांचे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. असंच प्रेम कायम करत राहा.’ काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाचं चित्रीकरण संपवून गंगा घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती. बसची वाट पाहत असताना काही अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी तिला मारायला सुरुवात केली. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तिने पटकन रिक्षा पकडली. तशाच भेदरलेल्या अस्वस्थेत रिक्षामध्ये असताना तिने व्हिडीओ चित्रित केला आणि चाहत्यांसोबत शेअर केला. ज्यात तिने घडलेला संपूर्ण प्रसंगाचं वर्णन केलं. तो व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनी लगेच तिला मदत केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dV0BRa