Full Width(True/False)

BSNL ने लाँच केले ३ नवीन प्लान, ५०० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार, पाहा किंमत

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने तीन नवीन डीएसएल ब्रॉडबँड प्लान लाँच केले आहेत. या प्लानची किंमत २९९ रुपये, ३९९ रुपये, ५५५ रुपये आहे. या प्लानमध्ये 10Mbps ची स्पीड मिळणार आहे. हा प्लान १ मार्च पासून रोलआउट केला जाणार आहे. हे डीएसएल ब्रॉडबँड प्लान बीएसएनएल भारत फायबर प्लानच्या तुलनेत स्पीड कमी देतो. या प्लानमध्ये तुम्हाला अनुक्रमे १०० जीबी, २०० जीबी आणि ५०० जीबी एफयूपी लिमिट मिळणार आहे. डेटाची लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होते. वाचाः TelecomTalk च्या रिपोर्टच्या अनुसार, BSNL च्या २९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानचे नाव 100GB CUL आहे. या प्लानमध्ये १०० जीबी डेटा 10Mbp च्या स्पीडने मिळतो. तर 100 जीबी डेटाची लिमिट संपल्यानंतर या डेटाची स्पीड कमी होऊन 2Mbps होते. रिपोर्टमध्ये म्हटले की, हा प्लान केवळ ६ महिन्यांसाठी आहे. यानंतर युजर्संना ३९९ रुपयांच्या प्लान प्रमाणे स्थानांतरित केले जाईल. हा प्लान अंदमान निकोबार सोडून देशातील सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध केला जाणार आहे. वाचाः 200GB CUL ची किंमत ३९९ रुपये आहे. ज्यात 200GB डेटा 10Mbps च्या स्पीडने मिळतो. डेटाची लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 2Mbps होते. शेवटी ५०० रुपयांच्या DSL ब्रॉडबँड मध्ये 500GB डेटा 10Mbps ची स्पीड कमी होते. तर ५०० जीबीची लिमिट संपल्यानंतर डेटाची स्पीड कमी होऊन 2Mbps होते. या तिन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट मिळते. युजर्संना २९९ रुपये, ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५०० रुपयांची सिक्योरिटी डिपॉझिट करावे लागणार आहे. रिपोर्टमध्ये हेही सांगितले गेले आहे की, २९९ रुपये आणि ५५५ डीएसएल ब्रॉडबँड प्लान नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय, बीएसएनएलचे काही प्लान महिन १०.५ २०.५ महिना आणि ३०.५ महिन्यासाठी ऑफर केले जातात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NSaJPX