मुंबई- बॉलिवूडची रंगपंचमी प्रत्येक वर्षी निराळी असते. परंतु, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर चाहत्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी त्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत चाहत्यांना घरीच रंगपंचमी साजरी करण्याचं आवाहन केलं. त्यातही कलाकारांनी घरच्या घरी साजऱ्या केलेल्या रंगपंचमीचा थाट पाहण्यासारखा होता. सगळ्यांचा आवडता आणि करीना- सैफचा लाडका असलेल्या तैमूरने देखील ही रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी केली आहे. त्याचे रंगपंचमी साजरी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. करीनाने तैमूरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तैमूरचा रंग खेळल्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यात तो गुलाबी रंगाने माखलेला होता. त्यातही छोट्या नवाब साहेबांची फोटो काढायची पोज चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. त्यांनी तैमूरचं खूप कौतुक केलं आहे. हा फोटो पोस्ट करत करीनाने सगळ्यांना सांभाळून रंग खेळण्याचं आवाहन केलं होतं. त्यासोबतच सैफ अली खानची बहीण सोहा खेमूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. ज्यात ती तिच्या लाडक्या मुलीला रंग लावताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत तैमूरसोबत पाण्यात खेळण्यात व्यग्र आहे. ते दोघेही एका मोठ्या टब मध्ये एकमेकांवर पाणी उडवत आहेत आणि एकमेकांना रंग लावत आहेत. सोहाने शेअर केलेले हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर वायरल झाले आहेत. चाहते तैमूरचा पाण्यातला खेळ पाहून त्याच्या प्रेमात पडले आहेत. नुकताच करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे तैमूरची लोकप्रियता संकटात आहे, असे मीम सोशल मीडियावर फिरत होते. करीना आणि सैफच्या दुसऱ्या बाळाच्या नावावरूनही सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. परंतु, अजून त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या नावाची घोषणा केलेली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39Ir7un