Full Width(True/False)

शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची 'मास्क' धुळवड; व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई: रंगपंचमी आणि होळी म्हटलं की सिनेसृष्टीतील कलाकारांचा उत्साह शिगेला पोहोचतो. यंदा करोनाचं सावट असल्यानं अनेक कलाकारांनी कुटुंबियांसोबतच धुळवड साजरी करणाच्या निर्णय घेतला. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता देखील होळीचा सण साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेला आहे. आज धुळवड साजरी करतानाचा एक व्हिडिओ शिवनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत शिव आणि त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी देखील पार्टी मास्क घातले आहेत. त्यामुळं या व्हिडिओत नक्की कोण कोण आहे? हे ओळखणं कठिण जात आहे. त्यातच शिवची गर्लफ्रेंड हिनंही पार्टी मास्कमधील एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामुळं एकत्र होळी सेलिब्रेट करतायत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करा अशी विनंतीही चाहत्यांकडून या व्हिडिओवर करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. ब्रेकअपची चर्चा!मराठी बिगबॉसच्या सिझन दोनचा विजेता अभिनेत्री वीणा जगतातसोबत नात्यात आहे. त्यांचं प्रेम बिगबॉसच्या घरात फुललं. त्यानंतर अनेकदा त्यांच्या एकत्र फोटोंना चाहत्यांची दाद मिळाली. मध्यंतरी शिव आणि वीणा वेगळे झाले आहेत का, अशा वावड्या उठल्या. दुसरीकडे हे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यावर उत्तर देत शिवनं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तो म्हणाला, ‘वीणा आणि मी सध्या खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत आहेत. ती मालिकेच्या कामात व्यग्र आहे आणि मी माझ्या. लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. अंतर वाढलं की वाद होतात, रुसवे फुगवे होतात, एकमेकांची समजून काढणंही होतं आणि त्यामुळे प्रेमही वाढतं. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करून योग्य त्या वेळी लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायला आवडेल.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rrBoAY