Full Width(True/False)

Fact Check: अजय देवगणला दिल्लीत झाली मारहाण? काय आहे सत्य

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नेहमीच त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अलिकडच्या काळात 'तान्हाजी' चित्रपटातील अभिनयसाठी त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अजय देवगण सोशल मीडियावरही बराच सक्रिय आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओनुसार दिल्लीमध्ये झालेल्या दोन गटातील मारहाणीत अजय देवगणचं नाव जोडलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे ती व्यक्ती बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आहे असा दावा केला जात आहे. मात्र अभिनेत्याकडून या व्हिडीओबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. व्हिडीओत असलेला माणूस अजय देवगणसारखा दिसत आहेत. पण तो अजय देवगणच आहे याबाबतची पुष्टी कोणीही केली नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत दावा केला जात आहे की, या व्हिडीओमध्ये अजय देवगण असून तो यावेळी नशेत होता आणि कार पार्किंगवरून सुरू झालेलं हे भांडण पुढे मारहाणीपर्यंत पोहोचलं. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असलेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती दुरून अजयसारखा दिसत असला तरीही तो अजयच आहे हे कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही. एका सोशल मीडिया युझरनं या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. ज्यात पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलेल्या व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्या युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला माहीत नाही हा अजय देवगण आहे की नाही पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये खूप राग आहे आणि त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये अजय देवगण असल्याचा दावा केला जात आहे.' अर्थात यावर अनेक लोकांनी कमेंट करत हा व्हिडीओ दिल्ली एअरपोर्टवरील असल्याच म्हणत त्यात दिसणारी व्यक्ती अजय देवगण नाही तर दुसरंच कोणी असल्याचं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wbX6fN