मुंबई: अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर धम्माल व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे रितेश देशमुखसोबतचे व्हिडीओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरताना दिसतात. आता होळीच्या निमित्तानंही जेनेलियानं रितेशसोबत रोमँटिक अंदाजातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेहमीच अनेक विनोदी आणि धम्माल व्हिडीओ शेअर करणाऱ्या जेनेलियानं होळीच्या सणानिमित्त रितेशसोबतचा एक रोमँटिक अंदाजातील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलिया रंगात रंगले आहेत आणि जेनेलिया रितेशवर फुलांच्या पाकळ्या फेकताना दिसत आहे. यानंतर रितेशसुद्धा रोमँटिक अंदाजात जेनेलियाच्या चेहऱ्याला रंग लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जेनेलियानं लिहिलं, करोना व्हायरसमुळे असलेल्या निर्बंधात खास पद्धतीनं सण साजरा करा. सेलिब्रेशन छोटं का असेना त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. जेनेलिया डिसूझा- देशमुख नेहमीच मित्रांसोबतच्या विकेंड पार्टीचे किंवा रितेश देशमुखसोबतचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यावर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो आणि अनेकदा हे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. दरम्यान, जेनेलिया आणि रितेशनं २००३ मध्ये एकत्र 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर झालेली या दोघांची मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केलं. दोघांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m5vvbx