Full Width(True/False)

दीपिका आणि संजय लीला भन्साळी यांच्यात वादाची ठिणगी; 'हे' आहे कारण

मुंबई- लोकप्रिय अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. परंतु, तिच्या या यशात जेवढा वाट तिच्या अभिनयाचा आहे तेवढाच वाटा यांचाही आहे. या दिग्दर्शक अभिनेत्रीच्या जोडीने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. संजय यांनी दीपिकासोबत तीन हिट चित्रपट केले. , '' आणि या चित्रपटांनंतर संजय दीपिकासोबत आणखी एका चित्रपटात काम करण्यास उत्सुक होते परंतु, अभिनेत्रीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचं कळतंय. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, संजय यांनी दीपिकाला त्यांचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' मध्ये एका नृत्यासाठी विचारणा केली होती. परंतु, दीपिकाने त्यांची ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यानंतर भन्साळी यांनी दीपिकाला त्यांच्या आगामी वेबसीरिज 'हिरा मंडी' मध्ये एक नृत्य किंवा एक भूमिका अशी ऑफर दिली होती. परंतु, दीपिकाने ती ऑफरदेखील नाकारली आहे. यानंतर स्वतः भन्साळीदेखील दीपिकावर रागावले असल्याचं कळतंय. इतकंच नाही तर, भन्साळी यांनी दीपिका, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत 'बैजू बावरा' चित्रपटदेखील करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दीपिकासोबत झालेल्या वादामुळे हा चित्रपटदेखील रखडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भन्साळी स्वतः याबद्दल दीपिकासोबत बोलणार आहेत. दीपिकाला भन्साळी यांच्या 'गंगुबाई काठियावाडी' मध्ये भूमिका करायची होती आणि प्रियांका चोप्रानंतर तिची निवडदेखील केली गेली होती. परंतु, जेव्हा सलमान खान आणि आलियाचा 'इंशाअल्लाह' चित्रपट बनू शकला नाही तेव्हा भन्साळी यांनी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आलियाला देऊ केला. त्यामुळे दीपिका नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यानंतर भन्साळी दीपिकाची समजूत काढणार का हे पाहणं औसुक्याचं ठरेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d8je24