Full Width(True/False)

करोना- सतिश कौशिक यांची मुलगी इस्पितळात, रडणं थांबेना!

मुंबई- बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सध्या अत्यंत काळजीत असून त्यांना त्यांच्या मुलीची चिंता सतावत आहे. काही दिवसांपूर्वी सतीश यांना करोनाची लागण झाली होती. काही दिवस घरी क्वारन्टीन राहिल्यानंतर ते इस्पितळात भरती झाले होते. त्यांचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते आता घरी आले आहेत. पण या सगळ्यात त्यांची पाच वर्षांची मुलगी वंशिकालाही करोनाची लागण झाली असून तिला इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. सतीश यांची मुलगी लहान असून तिचीदेखील करोना चाचणी करण्यात आली होती. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिलाही इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. आता तिची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांच म्हणणं आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असूनही तिचा ताप मात्र वाढतच चालला आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार सतीश यांनी म्हटलं की, 'माझी प्रकृती स्थिर आहे. परंतु, माझी मुलगी वंशिका पाच दिवसांपासून इस्पितळात आहे. तिचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरीही तिचा ताप उतरत नाहीये. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा.' करोना संसर्गाचा धोका छोट्या मुलांना जास्त आहे कारण त्यांची प्रतिकारशक्ती मोठ्यांपेक्षा कमी असते. सतीश यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांना तिच्या तापामागील कारण कळायला अडचणी येत आहेत. तिचा ताप १०० ते १०१ डिग्री आहे. ती रोज फोन करून त्यांच्याशी बोलते. परंतु, बोलताना ती त्यांना भेटण्यासाठी हट्ट करते आणि रडते. मुलीचा रडतानाचा आवाज ऐकून सतीश आणखीन बैचेन होतात. तिला भेटण्यासाठी त्यांचं काळीज तुटतं पण ते सध्या काहीच करू शकत नाहीत. आपल्या अनुभवातून सतीश कौशिक यांनी इतरांना मुलांचं आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय वंशिकासाठी प्रार्थना करण्याची विनंतीदेखील केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31rP1W6