Full Width(True/False)

खिशात २९९ रुपये असल्यास Itel चे 4G स्मार्टफोन खरेदी करा, १२०० शहरात 'ही' ऑफर

नवी दिल्लीः एन्ट्री लेवल स्मार्टफोन्स लाँच करणाऱ्या प्रसिद्ध ब्रँड Itel ने लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि Itel Vision 1, Itel Vision 1 Pro, Itel A25 Pro आणि Itel A48 सारख्या जबरदस्त 4G स्मार्टफोन्सची विक्री वाढवण्यासाठी Bajaj Finserv सोबत मिळून एका खास ऑफरची घोषणा केली आहे. मोबाइलची किंमत ५ ते ७ हजार रुपये असली तरी तुम्ही फक्त २९९ रुपयांत हा फोन खरेदी करू शकता. यानंतर तुम्हाला ईएमआय द्यावा लागणार आहे. यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट नाही. म्हणजेच तुमच्या खिशातून फक्त २९९ रुपये काढा आणा मोबाइल खरेदी करा. वाचाः १२०० शहरात ही ऑफर आयटेलचे मोबाइल केवळ २९९ रुपयांत खरेदी करू शकता. ज्याच्यांकडे Bajaj Finserv EMI Network Card असे त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. आयटेल आणि बजाज फिनसर्वची ही ऑफर भारतातील २६ राज्यातील १२०० हून जास्त शहरात उपलब्ध करण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास बजाज फिनसर्वचे ईएमआय नेटवर्क कार्ड आणि २९९ रुपये घेऊन दुकाना जा आणि ५ ते ७ हजारांचा फोन केवळ २९९ रुपयात घरी घेऊन या. वाचाः काय आहे ही ऑफर Itel आणि Bajaj Finserv ने ही ऑफर का आणली आहे. कोणकोणती स्कीम आणि ऑफर मध्ये काय काय आहे. सर्वात आधी सांगितले पाहिजे की, भरातात केवळ ५५ टक्के लोकांकडे ४ जी मोबाइल आहे. म्हणजेच ४५ टक्के लोकांकडे फीचर फोन आहेत. ते फोन ३ जी सपोर्ट सोबत आहेत. त्यामुळे आयटेलचा प्रयत्न आहे की, कमी ईएमआय आणि केवळ २९९ रुपये सुरुवातीला देऊन चांगला ४जी स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी कंपनी देत आहेत. त्यानंतर आरामात ६ महिने ईएमआय भरा. वाचाः ऑफर आणि स्कीम Itel आणि Bajaj Finserv च्या ऑफर आणि स्कीम अंतर्गत Double Zero स्कीम मध्ये Itel Vision 1 च्या 3जीबी रॅम व्हेरियंट, Vision 1 Pro, itel A25 Pro आणि itel A48 ला तुम्ही २९९ रुपयांच्या प्रोसेसिंग फीवर खरेदी करू शकता. त्यानंतर ६ महिने मंथली १७२५ रुपेय, ११७५ रुपये, १५१५ रुपये, ईएआय भरू शकता. तर No-Cost EMI ऑफर मध्ये Itel A48, Vision 1 Pro, Vision 1 ला २९९ रुपयांच्या प्रोसेसिंग फी सोबत १२२० रुपये, १३८० रुपये, आणि १४०० रुपये नो कॉस्ट ईएमआय भरू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t4mcef