Full Width(True/False)

Oppo F19 Pro वरून ८ मार्चला पडदा उठणार, क्वॉड कॅमेरा सेटअपसह हे फीचर्स मिळणार

नवी दिल्लीः ओप्पो भारतात आपली एफ १९ सीरीज लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने फ्लिपकार्टवरून च्या लाँचिंगची तारीख उघड केली आहे. फ्लिपकार्टवर बनवण्यात आलेल्या बॅनरच्या माहितीनुसार, Oppo F19 Pro स्मार्टफोनला ८ मार्च रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. ओप्पोकडून या दिवशी F19 Pro+ 5G हँडसेट सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. या बॅनरवरून स्मार्टफोनची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. वाचाः Oppo F19 Pro मध्ये फ्रंट कॅमेरा साठी पंच होल कटआउट सोबत एक फ्लॅट डिस्प्ले दिला जाणार आहे. रियर पॅनेलवर एक क्वॉड कॅमेरा सेटअप असणार आहे. याआधी ओप्पो एफ १९ सीरीजच्या या दोन्ही फोनची डिटेल्स आता लीक झाली आहेत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Oppo F19 सीरीज भारतात ८ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाँच आधीच फ्लिपकार्ट बॅनर वरून या सीरीजच्या डिव्हाइसची माहिती उघड झाली आहे. बॅनर इमेजच्या माहितीनुसार, एफ १९ प्रो मध्ये एक फ्लॅट स्क्रीन दिली आहे. यात खाली मोठे बेजल असणार आहेत. तर डिस्प्लेवर वरच्या बाजुला कोन्यावर एक होल पंच कटआउट दिले जाणार आहे. फ्लिपकार्टवरून खुलासा करण्यात आला आहे की, या फोनमध्ये रियरवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. बॅनरवरून हेही उघड झाले आहे की, ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये कलर पोर्ट्रेट व्हिडिओ मोड सोबत येणार आहे. वाचाः OPPO F19 Pro: ची वैशिष्ट्ये ओप्पोच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये एक पंच होल कटआउट आणि इन डिसप्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो पी ९५ प्रोसेसर, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4310mAh बॅटरी दिली जाणार आहे. या फोनमध्ये रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. याशिवाय फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर उपलब्ध केला जाणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ओप्पो एफ १९ प्रोची किंमतीचा खुलासा टिप्स्टर सुधांशूने केला आहे. या फोनची किंमत भारतात २० हजारांच्या जवळपास असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/303gNYt