मुंबई: भारतीय गोलंदाज अनेक वर्षं क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याचा डेब्यू चित्रपट 'फ्रेंडशिप'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या चित्रपटात हरभजन सिंगचा हटके अवतारात दिसणार आहे. ज्यात कॉलेज लाइफ, अॅक्शन आणि क्रिकेट याचा समावेश असणार आहे. हरभजन सिंगनं त्याचा पहिला तमिळ चित्रपट फ्रेंडशिपचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर त्याच्या अभिनय कौशल्याचं कौतुक होताना दिसत आहे. हरभजन सिंग क्रिकेटनंतर आता तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना हरभजननं लिहिलं, 'शार्प, क्रिस्प, इन्टेन्स, माझा चित्रपट 'फ्रेंडशिप'चा हा ट्रेलर, एन्जॉय करा.' हरभजनच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याचा मित्र व्हीव्हीएस लक्ष्मणनं सुद्धा त्याचं कौतुक केलं आहे. त्याच्या या ट्वीटवर भज्जीनं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. हरभजन सिंगच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या यांनी केलं आहे. या चित्रपटात हरभजन सिंगसोबतच अर्जुन आणि 'बिग बॉस' तमिल फेम लोसलिया मारियानेसन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाचंही प्रदर्शन करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलं होतं. हरभजन सिंगच्या या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रेटींनी सुद्धा केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bQrDGF