नवी दिल्लीः शाओमीने नुकतीच भारतात आपली लेटेस्ट Redmi Note 10 Series लाँच केली आहे. या नवीन सीरीज लाँचिंग नंतर कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या रेडमी नोट ९ स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. गेल्यावर्षी जुलै मध्ये या स्मार्टफोनला लाँच करण्यात आले होते. आता या फोनच्या तीन व्हेरियंट स्वस्त करण्यात आले आहे. जर तुम्हाला रेडमीचे स्मार्टफोन खरेदी करायचे असतील ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. वाचाः ची किंमत रेडमी नोट ९च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला ११ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. परंतु, आता य फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हे मॉडल १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. या फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचे मॉडल मध्ये सुद्धा १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः Redmi Note 9 चे फीचर्स रेडमीच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2340 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये पॉवर साठी ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sRkqgs