Full Width(True/False)

Video- लॉर्ड बॉबी देओल! १९९७ मध्येच केली होती ऐश्वर्याची स्वॅब टेस्ट

मुंबई- सोशल मीडियावर नेटकरी कधी काय करतील याचा नेम नाही. बॉलिवूड अभिनेता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने यावेळेस काहीही केलेलं नाही. परंतु, त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'आश्रम' या वेबसीरिजमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून बॉबीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली. अनेक वर्षांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या बॉबीने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. काही दिवसांपूर्वी बॉबीचा अम्पायर असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हाही प्रेक्षकांनी त्याचा खूप आनंद घेतला होता. आता पुन्हा एकदा असाच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशभरात सुरू असलेल्या करोनाच्या साथीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ठिकठिकाणी अनेकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. बॉबीच्या चाहत्यांचं असं म्हणणं आहे की बॉबीला करोनाबद्दल पूर्वीच माहीत पडलं होतं. तशा आशयाचा व्हिडीओदेखील त्यांनी तयार केला आहे. बॉबीच्या चित्रपटांमधील काही सीन एकत्र जोडून तो करोनाबद्दल आधीच सगळ्यांना सांगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओत त्याने ऐश्वर्या रायची स्वॅब टेस्टदेखील केली आहे. हा व्हिडीओ त्यांच्या १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'और प्यार हो गया' चित्रपटातील आहे. व्हिडिओमध्ये तो ऐश्वर्याला म्हणतो, 'प्रेमाने नाही तर जबरदस्तीने, शिंक...' असं म्हणताना दिसतो. पाहा हा मजेशीर व्हिडिओ- त्याशिवाय बॉबी सनी देओलला म्हणतो, 'नाही दादा, हात लावू नको, हा रोग मलाही होईल.' या वाक्याला सोशल डिस्टन्सिंगशी जोडलं गेलं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये बॉबी मास्क वापरताना दिसत आहे. तसेच तो हातही धुवत आहे. 'बिच्छू' चित्रपटातील एका सीनमध्ये त्याने दरवाजाला आतून अनेक लॉक लावले आहेत. त्याचा संबंध नेटकऱ्यांनी क्वारन्टाइनशी जोडला आहे. बॉबीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dfluEU