Full Width(True/False)

अभिमानास्पद! यूएसच्या नौदलाने गायलं 'स्वदेस' चित्रपटातील गाणं

मुंबई- भारतात निरनिराळ्या विषयांवर चित्रपट बनवले जातात. एखाद्या विषयाचा अभ्यास करून तो अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला जातो. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचीही दाद मिळते. बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपटांची तर अनोखी परंपरा आहे. भारतीयांना देशातील इतिहासावर बनलेले चित्रपट पाहायला भरपूर आवडतात. त्यातही चित्रपटातील देशभक्तीपर गाण्यांकडे त्यांची ओढ जास्त असते. बॉलिवूड चित्रपटातील ही देशभक्तीपर गाणी फक्त भारतात प्रसिद्ध आहेत असं नाही तर इतर देशांतही या गाण्यांवर प्रेम करणारे अनेक प्रेक्षक आहेत. असं म्हणण्यामागील कारण म्हणजे यूएसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका समारंभात अभिनेता याच्या '' चित्रपटातील गाणं गायलं गेलं. यूएस नौदल बॅण्डच्या एका कार्यक्रमात शाहरुखच्या 'स्वदेस' चित्रपटातील 'ये जो देश है तेरा' हे गाणं गायलं गेलं. या गाण्याचा व्हिडीओ भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. यूएस चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स मायकल एम गिल्ड आणि भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांच्या भेटीच्या समारंभामध्ये हे गाणं गाण्यात आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत तरणजीत यांनी शाह्रुखलादेखील टॅग केलं. त्यावर शाहरुखने भावुक होत रिट्विटदेखील केलं आहे. शाहरुखने म्हटलं, 'हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. किती छान. हा चित्रपट बनवतानाच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आणि हे गाणं ऐकून खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांचे आभार.' हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षक शाहरुख आणि यूएसच्या बॅण्डचं कौतुक करत आहेत. शाहरुखचा 'स्वदेस' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले होते. चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sBPMrQ