Full Width(True/False)

5000mAh बॅटरी आणि 48MP चा Moto G50 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः मोटोरोलाने गेल्या महिन्यात युरोपमध्ये आपले बजेट 5G स्मार्टफोन ला लाँच केले होते. आता कंपनीने या स्मार्टफोनला चीनमध्ये लाँच केले आहे. चीनमध्ये या फोनला केवळ ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटला लाँच केले आहे. याची किंमत १४९९ युआन (जवळपास १७ हजार १०० रुपये) आहे. जाणून घ्या फोनची फीचर्स आणि किंमत. वाचाः मोटो जी ५० चे फीचर फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिझाइनच्या या फोनमध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशियो मिळतो. ८जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ४८० ५जी चिपसेट दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनसोबत १० वॉटचा चार्जर देत आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स मिळतो. रियल फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा या फोन मध्ये दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vr31MN