Full Width(True/False)

Realme चाहत्यांसाठी बॅड न्यूज, ४ मे रोजी होणारा इव्हेंट रद्द, पाहा कंपनीने काय म्हटले

नवी दिल्लीः जर तुम्ही ४ मे रोजी होणाऱ्या रियलमी इव्हेंटची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. कंपनीने या इव्हेंटला सध्या तात्पुरते स्थगित केले आहे. ने भारतात COVID-19 ची दुसरी लाट आल्याने आपला अपकमिंग लाँच इव्हेंटला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचाः कंपनी यात MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरचा एक नवीन फ्लॅगशीप फोन लाँच करणार होती. रिपोर्ट्समध्ये म्हटले की, यात Realme X7 Max नावाने लाँच केले जाणार होते, जे Realme GT Neo चे एक रीब्रांडेड मॉडल होते. ज्याला चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले होते. इव्हेंट मध्ये कंपनी शक्यतो Realme TV 4K 43-इंच मॉडल लाँच करणार होती. वाचाः सीईओ माधव सेठने ट्विट करून दिली माहिती एका ताज्या ट्विट मध्ये Realme India चे CEO माधव शेठ यांनी याला दुजोरा दिला आहे. कंपनी अपकमिंग लाँच आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनला स्थगित करीत आहे. कारण, भारतातील परिस्थिती बिकट झाली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, सावधपणे विचार केल्यानंतर रियलमीने अपकमिंग स्मार्टफोन आणि AIoT प्रोडक्ट्स च्या लाँचिंग आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठिण परिस्थितीत जितके शक्य आहे तितके योगदान देण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. आम्ही लवकरच परत येऊ. वाचाः इव्हेंट कधी होणार याची माहिती दिली नाही सेठने एक छोटा नोट अटॅच केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना प्रासंगिक कोविड १९ सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह केला आहे. यात लिहिले की, सर्वांना आवाहन आहे की, तुम्ही तुमच्या कुटुंबावर आणि स्वतःवर लक्ष ठेवा. एकमेकांना मदत करा. वाचाः दरवर्षी Anniversary सेलिब्रेट करते Realme कंपनीने ४ मे ला लाँच इव्हेंटला रद्द केले आहे. परंतु, हा इव्हेंट कधीपर्यंत आयोजित करण्यात येईल, याविषयी, कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कंपनी लवकरच नवीन तारखेची घोषणा करू शकता. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eUlgnx