नवी दिल्लीः भारतात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे याचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातील करोना रुग्णांचे केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनने एक निर्णय घेतला आहे. देशातील करोना महामारीत ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनने म्हटले की, देशातील काही शहरात फक्त आवश्यक सामानांची डिलीवरी केली जाणार आहे. वाचाः बीजीआर रिपोर्टनुसार, अॅमेझॉनची वेबसाइटवर .in वर यासाठी एक मोठा बॅनर लावला आहे. या बॅनरवर फक्त आवश्यक सामानांची डिलीवरी केली जाणार आहे, असे लिहिले आहे. अॅमेझॉनच्या अधिकृत स्टेटमेंटनुसार, सरकारच्या गाइडलाइन्सला फॉलो करण्यासाठी अॅमेझॉनने हा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन केवळ आवश्यक सामानांची डिलीवर करीत आहे याला डिलीवरी करण्यासाठी नॉर्मलपेक्षा जास्त टाइम लागत आहे. अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे की, आम्ही सरकारच्या गाइडलाइन्सचे पालन करीत आहोत. जर एखाद्या ठिकाणी लॉकडाउन आहे. त्या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले की, आवश्यक सामानांची डिलीवरी करा. तर तसेच केले जाणार आहे. वाचाः आवश्यक सामानांच्या यादीत हँडवॉश, सॅनिटायजर, डिसइन्फेक्ट, ग्रॉसरी, ग्रुमिंग इसेंशियल, स्कीन अँड हेयर केयर, पर्सनल केयर, हेल्थ फिटनेस, बेबी केयर अँड सप्लाय, क्लिनिंग अँड हाउस सप्लाय आदीचा समावेश आहे. करोनाच्या मदतीसाठी अॅमेझॉन पुढे आले आहे. अॅमेझॉनने मदत करण्यासाठी ACT Grants, Temasek Foundation आणि Pune Platform सोबत पार्टनरशिप केली आहे. यासाठी अॅमेझॉन ८००० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर आणि 500 BiPAP मशीनला एयरलिफ्ट करणार आहे. याशिवाय, अॅमेझॉनकडून १५०० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर आवश्यक हॉस्पिटल मध्ये दिले जाणार आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sYLyKi