मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची आताची इमेज आणि पूर्वीची इमेज यामध्ये खूपच फरक पडला आहे. असा फरक अन्य कोणत्याही कलाकाराच्या बाबत झालेला आतापर्यंत दिसलेला नाही. पडद्यावर दिसणारा खिलाडी अक्षय वास्तव आयुष्यामध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न झाल्यानंतर अतिशय सांसारिक आणि कुटुंबवत्सल गृहस्थ झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याची इमेज ही 'देशभक्त कुमार' अशी ही होती. अक्षय कुमारच्या खासगी आयुष्यातील अशा अनेक गोष्टी, किस्से आहेत की त्या थेट त्याच्या चारित्र्याशी संबंधित असून त्यावर थेट प्रश्न उपस्थित करणा-या अशा आहेत. असाच एक किस्सा आहे त्याच्या आणि शिल्पा शेट्टीच्या लवस्टोरीचा. या दोघांची लवस्टोरी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय होती. परंतु या दोघांच्या लवस्टोरी लग्नापर्यंत पोहोचू शकली नाही. प्रेमसंबंध आणि नव्वदच्या दशकामध्ये आणि शिल्पा शेट्टीच्या लवस्टोरीची खूप चर्चा होती. सिनेमाशी संबंधित असलेल्या प्रत्येक मासिकातच नव्हे तर चहाच्या ठेल्यापर्यंत या दोघांच्या प्रेमप्रकरणावर चर्चा हमखास असायचीच.य १९९४ मध्ये रिलीज झालेल्या 'मैं खिलाडी तू अनाडी' या सिनेमापासून या दोघांमधील जवळीक वाढली. त्यानंतर त्यांच्यातील प्रेम फुलत गेले आणि अखेर २००० मध्ये त्यांच्यात खटके उडून ही लवस्टोरी संपुष्टात आली. शिल्पाशी ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने २००१ मध्ये ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले. एकाचवेळी दोघींवर प्रेम अक्षय कुमार आणि या दोघांमध्ये प्रेम होते. परंतु त्याच सोबत अक्षयचे रवीना टंडनसोबतही प्रेमप्रकरण सुरू होते... या दोघींनंतरअक्षयच्या आयुष्यामध्ये ट्विंकल खन्ना आली. या तिघी अभिनेत्री कोणेऐकेकाळी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. परंतु अक्षयने एकाचवेळी शिल्पा आणि रविनासोबत प्रेमप्रकरण सुरू केल्याने त्याच्यावर 'टू टायमिंग'चे गंभीर आरोप करण्यात आले. शिल्पा शेट्टीने तिच्या एका मुलाखतीमध्ये अक्षयकुमावर थेट आरोपच केले होते. प्रेमात मिळाला धोका अक्षयकुमारने सर्वात आधी रवीना टंडनला डेट करायला सुरुवात केली होती. रविना आणि शिल्पा दोघी छान मैत्रिणी होत्या. १९९४ मध्ये अक्षय आणि शिल्पाने एका सिनेमात एकत्र काम केले. तेव्हाही अक्षय रवीनाबरोबरच डेट करत होता. त्याच्या मित्रमंडळींच्या यादीमध्ये शिल्पा आली. त्याचवेळी 'टू टायमिंग' सारख्या गोष्टी पुढे आल्या. काही वर्षांनंतर एका डान्स रिअॅलिटी शो मध्ये शिल्पा आणि रविना दोघी परिक्षक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी प्रेमात मिळणारा धोका या विषयावर त्या दोघींनी त्यांची मते व्यक्त केली. त्यांनी सांगितले, 'या गोष्टींबद्दल आम्हा दोघींना जास्त माहिती आहे. आम्हा दोघींना एकाच व्यक्तीने धोका दिला आहे.' शिल्पाने घेतले अक्षयचे नाव शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'अक्षय माझ्याबरोबर डेट करत होता त्याचवेळी तो ट्विंकलाही डेट करत होता.' शिल्पाने केलेल्या या वक्तव्यावर अक्षयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिल्पा शेट्टीने ब्रेकअप झाल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'अक्षय कुमारने मला धोका दिला आहे. त्याने 'टू टायमिंग' केले आहे.' शिल्पाने अक्षयबरोबर असलेल्या नात्यावर पहिल्यांदा भाष्य करत ते असल्याचे कबूल केले होते. अक्षयबरोबर कधीच काम करणार नाही शिल्पा शेट्टीने याच मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, 'अक्षय कुमारसोबत भविष्यात मी कधीच काम करणार नाही.' खरे तर त्याच वर्षी अक्षय आणि शिल्पाचा 'धडकन' हा सिनेमा रिलीज झाला होता. जेव्हा शिल्पाला विचारले की तुझी मैत्रिण ट्विंकलवरही तू नाराज आहेस का? त्यावर शिल्पाने उत्तर दिले की 'तिच्याबद्दल मला कोणतीच तक्रार नाही. अक्षयच्या चुकांसाठी ट्विंकलला दोष देणे योग्य नाही.' अक्षयने माझा वापर केला या मुलाखतीमध्ये शिल्पाने सांगितले, 'अक्षयने माझा वापर केला आणि त्याच्या आयुष्यात आणखी कोणी आल्यानंतर त्याने अगदी सहजपणे मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे त्याच्यावर मी खूप नाराज आहे, कारण त्याने मला धोका दिा आहे. मला विश्वास आहे की येणा-या काळात याचा हिशोब नक्कीच होईल. अक्षयने जे काही केले आहे तेच त्याच्यासोबत घडेल.' अक्षयकुमार हे प्रकरण माझ्यासाठी संपले याच मुलाखतीमध्ये शिल्पाने सांगितले, 'अक्षयला विसरणे सोपे नव्हते. परंतु या ब्रेकअपच्या धक्क्यातून मी सावरले आहे. अक्षय कुमार हा माझा भूतकाळ आहे. तो माझ्या आयुष्यातील एक प्रकरण असून आता ते मी विसरून गेले आहे. मी यापुढे त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. त्याच्यासोबत प्रोफेशनली काम करणे कधीच शक्य होणार नाही.' ब्रेकअपनंतर नऊ वर्षांनी केले लग्न अक्षयकुमारबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यामध्ये अनेक वर्षे कुणीही नव्हते. त्यानंतर २००९ मध्ये तिने राज कुंद्रासोबत लग्न केले. राजचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको कविता कुंद्राला त्याने घटस्फोट दिला आणि शिल्पाशी लग्न केले. आता राज आणि शिल्पाला दोन मुले आहेत मुलगा विवान आणि मुलगी समीशा. अक्षय-ट्विंकललाही दोन मुले अक्षय आणि ट्विंकलही त्यांच्या संसारात खुष आहेत. या दोघांना आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gMw9Ku