नवी दिल्लीः तायवानची दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी आसुसने बुधवारी आपले झेनबुक सीरीजचा विस्तार करताना भारतात दोन नवीन लॅपटॉप ZenBook Duo 14 आणि OLED ला लाँच केले आहे. ZenBook Duo 14 (UX 482) ला ९९ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनलवर उपलब्ध करण्यात आले आहे. तर ZenBook Pro Duo 15 OLED (UX 582) ला मे महिन्यापासून २ लाख ३९ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः आसुस इंडिया, सिस्मट बिजनेस ग्रुप, कंज्यूमर अँड गेमिंग पीसीचे बिझनेस हेड आर्नोल्ड सु ने म्हटले की, त्यांचे काम इनोवेशन मर्यादेला पुढे नेण्याचे आहे. आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा उंचीवर नेणे व त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे आहे. आम्ही या प्रोडक्ट्ला भारतात आणण्यासाठी खूपच उत्साहित आहोत. वाचाः ZenBook Duo 14 चे फीचर्स ZenBook Duo 14 इंटेल ईओ आणि इंटेल आयरिस एक्स ग्राफिक्स सोबत यात ११ वे जनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर दिला आहे. हे Nvidia GeForce MX450 GPU च्या पर्यायासोबत आणले गेले आहे. कंपनीने म्हटले की, झेनबुक ड्युओ १४ इंचाचा एलईडी बॅकलिट फुल एचडी 1080 पिक्सल डिस्प्ले सोबत १०० टक्के SRGB कवरेज असल्याचा दावा केला आहे. वाचाः कनेक्टिविटीसाठी मध्ये दोन थंडरबोल्ट ४ पार्ट्स, वन USB 3.2 Gen 2 टाइप-ए पोर्ट, वन HDMI 1.4 आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला गेला आहे. हे Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.0 वायरलेस कनेक्टिविटी ऑप्शन सोबत येते. यात हर्मन कार्डन बॅक्ड स्पीकर्स दिले आहेत. याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर्ड नॉइज कँसिलिंग सॉल्यूशंस सोबत येते. यात कंपनीने 70Wh ची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १७ तास राहते. वाचाः Asus ZenBook Pro Duo 15 चे फीचर्स ड्यूल स्क्रीन शिवाय, ZenBook Pro Duo 15 OLED मध्ये १० वे जनरेशनचे इंटेल कोर i9 प्रोसेसर दिला आहे. जीफोर्स आरटीएक्स 3070 आणि 32 जीबी DDR4 रॅम दिला आहे. लॅपटॉपमध्ये नवीन टिल्टिंग स्क्रीनपॅड प्लस सोबत टचस्क्रीनची सुविधा दिली आहे. वाचाः नेनोएज ओएलईडी 4K डिस्प्ले शिवाय, झेनबुक प्रो डुओ 15 OLED सुद्धा यूजर्सला एक समग्र अनुभव प्रदान करण्यासाठी अल्ट्रा-स्लिम बेजलची सुविधा देते. यात दोन Thunderbolt 3 पोर्ट्स, एक USB 3.2 Gen 2 Type-A port, HDMI 2.1 आणि हेडफोन जॅक दिला आहे. याशिवाय कनेक्टिविटीसाठी यात Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.0 दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32fwjl9