Full Width(True/False)

जो पर्यंत स्वत:ला करोना होत नाही, तोपर्यंत नक्की काय होतं ते कळत नाही, अर्जुनं शेअर केला अनुभव

० साडे तीन वर्षांपूर्वी चित्रित झालेला '' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. कसं वाटतंय?- आम्ही चित्रीकरण करत होतो त्यावेळी आपल्या कोणाच्याच आयुष्यात नव्हता. या संकटामुळे सगळ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. सध्याची परिस्थिती वेगळी असली तरीही तिचा सामना करणारे आपण तेच आहोत. किंबहुना माणूस म्हणून आपण अधिक संवेदनशील झालो आहोत. 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपट गरीब-श्रीमंत या समाजातील आर्थिक दरीबद्दल भाष्य करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटेल याबाबत विश्वास आहे. ० या चित्रपटासाठी काही विशेष तयारी केली होती का?- या चित्रपटातील माझी भूमिका या आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निश्चितच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आम्ही चित्रीकरण ४० दिवसांत पूर्ण केलं. पण त्या आधी ९० दिवस मी तालीम करत होतो. मी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी माझ्या भाषेवर खूप मेहनत घेतली. दिल्लीला जाऊन तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. बंदूक चालवण्याचं प्रशिक्षणही घेतलं. ० तुला करोनाची लागण झाली होती. तो काळ किती कठीण होता ?- मला करोनाचा संसर्ग झाला होता. ती वेळ जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत नेमकं काय होतं, ते कळू शकत नाही. त्या दरम्यान आपली स्वतःची आणि कुटुंबाची मानसिक स्थिती सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. पण तरीही मी असं म्हणेन की कोविडनं मला खूप काही शिकवलं आहे. या काळानं मला स्वतःची नव्यानं ओळख करून दिली आहे. ० आता चित्रपटगृह सुरू झाली आहेत. त्याबद्दल काय वाटतं ?- प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ही कलाकारांची जबाबदारी आहे. गेलं वर्ष सगळ्यांसाठीचं खूप कठीण होतं. आपण मिळून आता एकमेकांना सावरायला हवं आहे. गेल्या वर्षभरात ओटीटी माध्यमांवर कलाकारांनी प्रेक्षकांचं सकस मनोरंजन केलं आहे. आता चित्रपटगृहही प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांची साथ आम्हाला प्रोत्साहित करते. गेल्या वर्षभरात आपण सगळ्यांनीच आर्थिक, मानसिक, शारीरिक चढ-उतार अनुभवलेत. जिद्दीनं संकटांचा सामना करत आहोत. आता नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आयुष्याकडे पाहायला हवं. संकलन - गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mbNgWO