Full Width(True/False)

करोना लस घेतल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांचं मलायकानं केलं तोंड बंद, म्हणाली...

मुंबई- बॉलिवूडची फिट अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असते. ती तिचे व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. राज्यभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना अनेक बॉलिवूड कलाकारांना करोना झाल्याच्या बातम्यादेखील कानावर पडत आहेत. त्यात सरकारने ४५ वर्ष वयावरील सर्व व्यक्तींना करोना लस देण्यास सुरुवात केली असल्याने मलायकाने देखील आज २ एप्रिल रोजी करोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. तिने लस टोचून घेतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर चाहत्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मलायकाने लस टोचून घेतानाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. सोबत तिने लिहिलं, 'मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, कारण या लढाईत आपण सोबत आहोत. चला योद्धयांनो या व्हायरसवर मात करून ही लढाई जिंकूया. लवकरच तुम्हीही तुमचा डोस घ्या, विसरू नका.' सोबतच तिने त्या सर्व करोना योद्धयांचे आभार मानले ज्यांनी आतापर्यंत जनतेची सेवा केली. त्यांनी त्यांची जबाबदारी अगदी हसऱ्या चेहऱ्याने पार पाडल्याबद्दल मलायकाने त्यांचं कौतुक केलं. पोस्टच्या शेवटी तिने लिहिलं, 'हो, करोना लस टोचून घेण्यासाठी दिलेल्या वयाच्या मर्यादेमध्ये माझं वय आहे.' मलायकाने भलेही ट्रोलर्सचं तोंड बंद करण्यासाठी हे लिहिलं होतं परंतु, तरीही नेटकऱ्यांनी तिला निरनिराळे प्रश्न विचारले. काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला तिचं खरं वय विचारलंय. तुम्ही खरच ४५ वर्षांच्या आहेत का, असा प्रश्नही एका युजरने केला आहे. मागील वर्षी मलायकाला करोनाची लागण झाली होती. तिने स्वतःला राहत्या घरी क्वारंटाइन करून घेतलं होतं. योग्य उपचार घेऊन तिने करोनावर मात केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wkbLFZ