Full Width(True/False)

पुष्कर- अमृता झालेत आई-बाबा, 'वेल डन बेबी' चित्रपटातील गाणं पाहिलंत का?

मुंबई- ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांना ट्रेलर प्रचंड आवडला असून त्यांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. 'आई- बाबा' असं गाण्याचं नाव असून हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गाण्यात एका जोडप्याचा आई - बाबा होण्याचा प्रवास चित्रित केला गेला आहे. आपलं बाळ त्यांच्या आई वडिलांसाठी किती आनंद घेऊन येतं याची जाणीव गाणं पाहताना होते. बाळाच्या नुसत्या येण्याच्या चाहुलीनेच जोडप्यांमधील नातं कसं उलगडत जातं याचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. गाणं सहजरित्या प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतं. आपणही आपसूकच गाणं गुणगुणू लागतो. या गाण्याविषयी बोलताना चित्रपटाचा अभिनेता म्हणाला, 'संगीत हा आमच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गाण्याला सखोल असा अर्थ आहे. प्रसंगांना साजेशा असलेल्या या गाण्यांमुळे चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो.' रोहन-रोहन ही मराठी सिनेक्षेत्रातील उत्कृष्ट जोडी असून त्यांनी ‘वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे. हे गाणं रोहन प्रधान याने गायलं असून वलय मुळगुंदने शब्दबद्ध केलं आहे. वेल डन बेबी’ हा चित्रपट प्रियांका तन्वर यांनी दिग्दर्शित केला असून मर्मबंधा गव्हाणे या सिनेमाच्या लेखिका आहे. तर पुष्कर जोग, आणि वंदना गुप्ते यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. येत्या 9 एप्रिलला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sQaYuc