Full Width(True/False)

कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय; अभिनेत्याकडून राहुल गांधींचं कौतुक

मुंबई: देशभरातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते यांनी पश्चिम बंगालमधील सर्व प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्यांनी सर्व राजकीय नेत्यांनाही मोठ्या प्रचारसभा घेण्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सामान्य नागरिक आणि सिनेसृष्टीतल कलाकरांनी स्वागत करत त्यांचं कौतुक केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता , दिग्दर्शक () यांनं सोशल मीडियावर राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांचे ट्विट रिट्विट करत हेमंतनं राहुल यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. 'आत्ताच्या काळात निवडणूका येतील जातील... यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल...पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे... देशाला आत्ता निवडणूका नकोत तर बेड्स हवेत, औषधं हवीत, ॲाक्सीजन हवाय! जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय! पण आपण या माणसावर हसुया, मस्करी करूया... मजेत राहुया! असं हेमंतनं रिट्विट करताना लिहिलं आहे. काय म्हणाले आहेत राहुल गांधी? ‘सध्याची कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन, मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करीत असून सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रचारसभा घेऊन होणाऱ्या परिणामांचा राजकीय नेत्यांनी बारकाईने विचार करावा,’ असे आवाहन राहुल यांनी केले. तसंच देशभरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा राजकीय प्रचारसभा घेत असल्याबद्दल काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3x9BnWe