Full Width(True/False)

एकाच वेळी करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झाले विकी- कतरिना

मुंबई- करोनामुळे सगळीकडेच चिंतेचं वातावरण आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बॉलिवूडवरही करोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. अनेक बॉलिवूड कलाकार करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्याचप्रमाणे असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करोनावर मात केली आहे आणि बरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर योग्य काळजी घेत ते करोनाच्या विळख्यातून बाहेर पडले. आता दोघेही करोनामुक्त झाले आहेत. परंतु, या गोष्टींमध्येदेखील काही चाहत्यांनी साम्य शोधून काढलं आहे. काही दिवसांपूर्वी विकी कौशलने तो करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती. त्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफने देखील ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. नुकतीच विकीने तो करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ कतरिनाने देखील तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी चाहत्यांना दिली. नेमकी याच गोष्टीवरून चाहत्यांमध्ये विकी आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा अजूनही रंगताना दिसत आहेत. योगायोगाने घडलेल्या या घटनेमुळे चाहत्यांमधील त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखीनच रंग चढला आहे. त्यावर युझर्स निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युझर्सचं म्हणणं आहे की, या दोघं एकमेकांसोबत होते आणि त्यामुळेच ते एकाच वेळेस पॉझिटिव्ह झाले आणि एकाच वेळेस निगेटिव्ह आले. तर काहींनी तर हा प्रेमाचा रंग असल्याचं म्हटलं आहे. यावर विकी आणि कतरिना यांपैकी कोणीही भाष्य केलेलं नाही. दोघांनी त्यांच्या नात्याचा अजून स्वीकार केलेला नाही आणि नकारही दिलेला नाही. यापूर्वी या प्रकरणावर बोलताना विकीने म्हटलं होतं की, 'मी जर आता काही बोललो तर आणखी चर्चा होतील. हे माझं खाजगी आयुष्य आहे आणि मला त्याबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3duReao