Full Width(True/False)

संघर्षाचा भन्नाट प्रवास; किरण माने यांची भावुक पोस्ट

संजना पाटील ‘’ या मालिकेतील वडिलांची म्हणजेच विलासची भूमिका साकारणारे अभिनेते यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली. ‘मुलगी झाली हो’मध्ये माऊने विलाससाठी उभ्या केलेल्या ‘विलास ऑटोमोबाइल्स’च्या उद्घाटनाचा सीन शूट करताना किरण भूतकाळात जाऊन पोहोचले. अभिनयाचा नाद सोडून आपल्या घराची बिकट आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी त्याच्या गावी साताऱ्यात ‘किरण ऑटोमोटिव्ह’ नावाचं दुकान सुरु केलं होतं. इच्छा नसतानाही अभिनय सोडून ‘इंजिन ऑइल्स’च्या व्यवसायात त्यांनी स्वतःला व्यग्र केलं. काही काळात त्यांची परिस्थिती सुधारली; पण ‘पैसा की पॅशन’ या संभ्रमात ते अडकले. एके दिवशी त्यांनी पुण्यातल्या ‘समन्वय’तर्फे पं. सत्यदेव दुबे यांच्या अभिनय कार्यशाळेच्या आयोजनाची जाहिरात बघितली. आयुष्यात नाटक-अभिनय नसेल तर जगण्याला तरी काय अर्थ? असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी अभिनयाच्या वाटेवर जायचं ठरवलं. ‘मुलगी झाली हो या मालिकेसाठी हा सीन शूट करत असताना सर्व जुन्या आठवणी अचानक डोळ्यांसमोर आल्या. काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. अभिनय सोडून जगणं फार कठीण गेलं. पं. सत्यदेव दुबे यांची जाहिरात पहिली तेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला होता. वडिलांची तिला एक अभिनेता म्हणूनच ओळख असावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे सर्व सोडून अभिनयाचा वसा घेतला', असं किरण यांनी सांगितलं. अत्यंत चढ उतार बघत त्यांनी अभिनय कला आत्मसात केली. त्यानंतर अभिनय क्षेत्रातला त्यांचा प्रवास अखंड सुरूच राहिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3szKX1a