Full Width(True/False)

अमेरिका बाहेरून आलेल्या लोकांमुळेच घडली- प्रियांका चोप्रा

मुंबई : आंतरराष्ट्रीय कलाकार प्रियांका चोप्राने ' 'सिनेमात दिसली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन इराणी वंशाचे अमेरिकन दिग्दर्शक रमीन बहरानीने केले आहे. अलिकडेच रमीन एक मुलाखत देत असताना त्याला वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर प्रियांकाने रमीनची बाजू घेत त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिली आहे. काय घडले होते... रमीन बहरानीहा एके ठिकाणी मुलाखत देत होता. मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देत होता. तेव्हा तिथे उभी असलेली एक व्यक्ती पुढे आली आणि रमीनला म्हणाली, 'तुम्हा सगळ्यांना असे वाटते का तुम्हीच जग चालवत आहात? खरे तर तुम्ही चालवत नाही तर सगळे बिघडवत आहात...' त्यानंतर तो माणूस व्यक्ती रमीनवर ओरडू लागला आणि म्हणाला तुझ्यासारख्यांनी अमेरिका सोडून निघून जायला हवे. या घटनेनंतर रमीन तिथून निघून गेला. या घटनेनंतर प्रियांकाने लगेचच आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका म्हणाली, 'अमेरिकेची निर्मिती, त्याचा शोध हा दुस-या देशातील लोकांनी लावला आहे. त्याच्या उभारणीमध्ये परदेशी नागरिकांचाही तितकाच मोलाचा सहभाग आहे. त्याच अमेरिकेमध्ये बाहेरच्या देशातील नागरिकांना अशा पद्धतीने कधी वागवले जाईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. अमेरिका हा देश स्वतंत्र्य आयुष्य, येथे मिळणा-या संधी आणि सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो.' परदेशात होणा-या वर्णभेदावर याआधीही अनेकदा प्रियांकाने तिची मते मांडली आहेत. तिने 'अनफिनिश्ड' या तिच्या पुस्तकामध्ये अमेरिकेत होणा-या वर्णभेदावर सविस्तरपणे तिची मते मांडली आहेत. सध्या प्रियांका तिच्या नव-यासोबत, निक जोनासबरोबर लंडनमध्ये रहात आहे. दरम्यान, पुढच्या वर्षात ती हिंदी सिनेमात दिसणार असल्याचेही तिने सांगितले आहे, त्यामुळे तिच्या या सिनेमाचे तिचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sxzvTX