नवी दिल्लीः in India: हँडसेट निर्माता कंपनी रियलमी भारतात आली सी सीरीजचा विस्तार करताना आणखी तीन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, सी सीरीज मध्ये रियलमी सी २० शिवाय Realme C21 आणि Realme C25 ला लाँच करणार आहे. रियलमी सी २० ला जानेवारी मध्ये व्हिएतनाममध्ये तर रियलमी सी २१ आणि रियलमी सी २५ ला गेल्या महिन्यात मलेशिया आणि इंडोनेशिया मध्ये बाजारात उतरवले होते. आता तिन्ही फोन भारतात लाँचिंगसाठी तयार आहेत. वाचाः तिन्ही फोनमध्ये Realme Mobiles वॉटरड्रॉप-डिस्प्ले नॉच दिले आहेत. या सीरीजचे प्रीमियम ऑप्शन रियलमी सी २५ आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000 mAh बॅटरी दिली गेली आहे. अन्य दोन स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः रियलमी सी २५ लाँचिंग डेट तिन्ही रियलमी स्मार्टफोन्स भारतात ८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता लाँच केले जाणार आहे. कंपनीने ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून या लाँचिंगची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, तिन्ही स्मार्टफोन्समध्ये ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे. वाचाः रियलमी सी २० ची किंमत रियलमी सी20, Realme C21 Price in India आणि Realme C25 Price in India संबंधी कोणतीही माहिती समोर आली नाही. तिन्ही फोन अन्य बाजारात लाँच करण्यात आले आहे. यावरून भारतातील या फोनच्या किंमतीचा अंदाज लावला जात आहे. रियलमी सी २० व्हिएतनाममध्ये VND 2,490,000 (जवळपास ७ हजार ९०० रुपये), रियलमी सी21 ला मलेशियात MYR 499 (जवळपास ८ हजार ८०० रुपये) आणि रियलमी सी25 ला इंडोनेशियामध्ये IDR 2,299,000 (जवळपास ११ हजार ६०० रुपये) मध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः Realme C20, C21 चे फीचर्स या दोन्ही स्मार्टफोन्ससाठी एकही पेज तयार करण्यात आले आहे. ज्यावरून याच्या काही प्रमुख फीचर्स संबंधी माहिती समोर आली आहे. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी, सुपर पॉवर सेविंग मोड, १३ मेगापिक्सलचा एआय ट्रिपल रियर कॅमेरा, एचडी प्लस डिस्प्ले, ब्राइटनेस ४०० निट्स आणि याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९.५ टक्के मिळाले आहे. वाचाः याशिवाय स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. कलर व्हेरियंट मध्ये रियलमी सी २१ चे कलर व्हेरियंटचे नाव, Cross Blue आणि Cross Black होणार आहे. रियलमी सी २० चे कलर व्हेरियंटचे नाव Cool Blue, Cool Grey असणार आहे. Realme C25 वैशिष्ट्ये फ्लिपकार्ट वर या फोनसाठी एक पेज बनवले असून यावरून ही माहिती समोर आली आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 6000 एमएएचची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट टाइप सी क्विक चार्ज सपोर्ट मिळतो. याशिवाय, स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी मीडियाटेक हीलियो जी ७० गेमिंग प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा मेन स्क्रीन टू बॉडी रेशियो ८८.७ टक्के आणि ब्राइटनेस ४८० निट्स आहे. याशिवाय, १३ मेगापिक्सलचा एआय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप होणार आहे. फोनचे दोन कलर व्हेरियंटची झलक पाहायला मिळते. Watery Blue आणि Watery Grey रंगात हे फोन येणार आहे. तिन्ही फोन TÜV Rheinland सर्टिफाइड आहेत. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ftX25n