Full Width(True/False)

लहानग्याच्या उपचारांसाठी मदत मागितली म्हणून ट्रोल झाला अर्जुन

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता याची चर्चा त्याच्या सिनेमांवरून अथवा त्याच्या अभिनयावरून कमी पण मलायका अरेरा सोबतच्या नात्यावरूनच जास्त होते. परंतु सोशल मीडियावर सध्या अर्जुन एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अर्जुनने एका मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी १६ कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी मदत करण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते. ही पोस्ट शेअर करताना अर्जुनने लिहिले होते, 'अयांश गुप्ता या मुलाला एक गंभीर आजार झाला असून त्यावर उपचार करण्यासाठी त्याला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे त्याला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा.' या आवाहनासोबत त्याने एक लिंक शेअर केली होती. अर्जुनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. काहींतर त्याला ट्रोल केले. एका युझरने लिहिले की, 'तुला आमच्याकडून मदत मागण्याची आवश्यकताच का आहे, तुझी एक दिवसाची जी कमाई आहे ती या मुलावर खर्च कर आणि त्याचा जीव वाचव.' अर्जुनचे सडेतोड उत्तर असंवेदनशील उत्तर देणाऱ्या युझरला अर्जुनने सडेतोड उत्तर दिले आहे. अर्जुन म्हणतो, 'तुम्ही योग्यच बोलत आहात. जर माझी एक दिवसाची कमाई १६ कोटी रुपये असती तर मला ही पोस्ट करायची गरजच भासली नसती. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी या मुलाला मदत केली आहे आणि त्याला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखलही केले आहे.' अर्जुनच्या या उत्तरावर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. अर्जुनचे आगामी सिनेमे अर्जुन कपूर बुधवारी 'एक विलन रिटर्न्स' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गोव्याला गेला. या सिनेमाचं चित्रीकरण गोव्यात होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तारा सुतारिया दिसणार आहे. अर्जुन आणि तारा यांच्याशिवाय या सिनेमात जॉन अब्राहम आणि दिशा पाटणीही आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा एक थ्रिलर सिनेमा आहे. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी हा सिनेमा रिलीज होईल. 'एक विलन रिटर्न्स' या सिनेमाशिवाय अर्जुन कपूर 'भूत पुलिस' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतमी मुख्य भूमिकेत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3douqZW