Full Width(True/False)

महागड्या स्मार्टवॉच सारख्याच दिसतात या फिटनेस स्वस्त बँड, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः Zebronics ने महागड्या सारख्या दिसणाऱ्या फिटनेस बँड भारतात लाँच करण्यात आले आहे. फिटनेस बँड ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सेंसर सारखी सुविधा दिली आहे. याशिवाय, हे ब्लड ऑक्सिजन सॅच्यूरेशन लेवल मोजमाप करणार आहे. वाचाः स्मार्ट बँड मध्ये 2.5D कर्व्ड ग्लास सोबत 3.3cm TFT टच कलर डिस्प्ले आहे. जो याला प्रीमियर फील देते. यात राउंड डायल आहे. सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात १०० हून जास्त कस्टमायजेबल वॉच फेसचा सपोर्ट मिळतो. बँड IP68 रेटेड आहे. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून याला कोणताही फरक पडत नाही. याला अँड्रॉयड आणि iOS दोन्ही डिव्हाइससोबत वापर केला जाऊ शकतो. वाचाः Zebronics Zeb-Fit2220CH भारतातील किंमत Zebronics Zeb-Fit2220CH स्मार्ट बँडची भारतात २ हजार ९९९ रुपये किंमत आहे. याला अॅमेझॉन वरून तीन वेगवेगळ्या कलर मध्ये खरेदी करू शकतो. ज्यात ब्लॅक केस विद ब्लॅक स्ट्रॅप, गोल्ड केस विद रोड गोल्ड स्ट्रॅप्स सिल्वर केस विद कॅडेट ग्रे स्ट्रॅपचा समावेश आहे. वाचाः Zebronics Zeb-Fit2220CH: फीचर्स स्मार्ट बँड मध्ये 3.3cm राउंड TFT टच कलर डिस्प्ले ची सुविधा आहे. हे १०० हून अधिक कस्टमाइयजेबल वॉच फेस सपोर्ट करतो. यात बॅडमिंटन, बास्केटबॉल, सायकलिंग, फुलबॉल, रनिंग, स्किपिंग, स्वीमिंग आणि वॉकिंग सह आठ स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. पुरेसी नीट झोप न येणे, पाउल, कॅलरी बर्न आणि ट्रॅकला मदत करण्यास मदत करते. यात कॉलर आयडी आणि कॉल रिजेक्ट फंक्शन्स सुद्धा आहे. युजर्स म्यूझिक सोबत पेयर करण्यात आलेल्या स्मार्टफोनचा कॅमेरा कंट्रोल करू शकतो. कनेक्टिविटीसाठी Zebronics चे हे स्मार्ट बँड ब्लूटूथ ५.० सोबत येते. यात 200mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा चार्ज केल्यानंतर यात ३० दिवसांची स्टँडबाय टाइम मिळतो. स्मार्ट बँडला प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OYdsrQ