Full Width(True/False)

'जनतेसाठी उभा असलेला एकमेव नेता' केदार शिंदेंनी केलं कौतुक

मुंबई: सध्या देशभरात करोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अशात केंद्र सरकारनं नुकताच लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता १८ वर्षांवरील सर्वांनाच करोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मे पासून सुरू होत असून केंद्र सरकारनं राज्य, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यांकडून लस खरेदी करण्यास मुभा दिली आहे. या निर्णयाचं ठाकरे सरकारनेही स्वागत केलं आहे. पण केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर दिग्दर्शक यांनी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंसंदर्भात एक ट्वीट केलं आहे ज्यात त्यांनी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य झाल्याचा उल्लेख केला आहे. केदार शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही? या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा.' काही दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती.जी पंतप्रधानांनी मान्य केली त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले होते. 'मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या व्हायरसवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल अशी आशा व्यक्त करतो ' असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. दरम्यान देशातील १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. 'देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून, तसा निर्णय घेण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलत १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ttUWXf