मुंबई- देशभरात करोना संक्रमण वाढताना दिसत आहे. राज्यातही करोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बॉलिवूडवरही करोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही एकापाठोपाठ एक करोनाची लागण होत आहे. लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टला देखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय. आलियाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने लिहिलं, 'माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःचं विलगीकरण केलं आहे आणि मी माझ्या घरात क्वारन्टाइन झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व औषधं सुरू आहेत. तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि काळजीसाठी खूप धन्यवाद. कृपया सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या.' मागील काही दिवसांपासून आलिया यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. काही दिवसांपूर्वी भन्साळी यांना देखील करोनाची लागण झाली होती. परंतु, ते ठीक झाल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. नुकतंच आलियाला रणबीर कपूरसोबत चित्रपटाच्या डबिंगदरम्यान पाहिलं गेलं होतं. ती रणबीरसोबत अयान मुखर्जी यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी मिलिंद सोमण, आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया, रमेश तौरानी, बप्पी लाहिरी आणि सतीश कौशिक यांना करोनाची लागण झाली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rI4HiP