मुंबई: बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते सध्या त्यांचं पुस्तक Stories I Must Tell मुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. या पुस्तकात कबीर बेदी यांनी त्यांची लग्नं, लव्ह लाइफ आणि रिलेशनशिपबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी या पुस्तकात अभिनेत्री आणि पहिली पत्नी प्रतिमा यांच्यासोबतच्या नात्यावरही सविस्तर भाष्य केलं आहे. याशिवाय त्यांच्या शेवटच्या लग्नाविषयी सुद्धा यात चर्चा केली आहे. वयाच्या ७० व्या वर्षी कबीर बेदी यांनी ५ वर्षांपूर्वीच परवीन दुसांझशी लग्न केलं होतं. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत कबीर बेदी यंनी सांगितलं की, त्यांनी पत्नी परवीन दुसांझशी लग्न करण्यापूर्वी तिला तिचं नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कबीर यांनी असं यासाठी केलं होतं कारण लोकांचा त्यांच्या आणि परवीन बाबी यांच्या नावात गोंधळ होऊ नये. अर्थात यांनी कबीर बेदी यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. कबीर बेदी म्हणाले, 'मी म्हणालो माझ्या आयुष्यात आधीच एक परवीन होती. त्यामुळे जर तुला वाईट वाटत असेल तर तू तुझं नाव बदलून घे. ज्यामुळे लोकांचा गोंधळ होणार नाही आणि याचं उत्तर देताना परवीन मला म्हणाली, मला माझं नाव बदलायला सांगण्याची तुमची हिंमत कशी झाली?' कबीर बेदी पुढे म्हणाले, 'पुढे जेव्हा परवीन इंग्लंडमधून भारतात आली तेव्हा तिला समजलं की, परवीन बाबी माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची होती. त्यानंतर मी तिला 'वी' या नावाने हाक मारायला सुरुवात केली. मी परवीन दुसांझसोबत सर्वाधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. आम्ही दोघंही १५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्यानंतर ५ वर्षांपूर्वीच आम्ही लग्न केलं आहे. हे खूप चांगलं आहे आणि माझं आयुष्य शेवटच्या टप्प्यात असताना अखेर योग्य मार्गावर आहे.' कबीर बेदी यांनी त्यांच्या पुस्तकात परवीन बाबी यांच्यासोबत अफेअर आणि आपली पहिली पत्नी प्रतिमासोबतच ओपन मॅरेज याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. लवकरच कबीर बेदी यांचं पुस्तक 'Stories I Must Tell: The Emotional Journey of an Actor' प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक त्यांनी मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात लिहिलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a4hAOo