नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यूजर्संना अनेक बेस्ट प्रीपेड प्लान ऑफर केले जात आहे. युजर्संना आकर्षित करण्यासाठी कंपन्या कमी किंमतीत जास्त बेनिफिटचे पर्याय युजर्संना देत आहेत. युजर्संना अशा प्लान्सचा शोध असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला जिओ आणि एअरटेलच्या १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट प्लानची माहिती देत आहोत. या प्लानमध्ये डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट दिले जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा १२९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. कंपनी या प्लानमध्ये इंटरनेट युसेजसाठी एकूण २ जीबी डेटा देते. या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. रोज १०० एसएमएस फ्री ऑफर दिले जाते. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा दिला जातो. २४ दिवसांची वैधता या प्लानमध्ये मिळते. देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये कंपनी १०० फ्री एसएमएस सोबत जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारख्या जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेलचा १२९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये इंटरनेट युसेज साठी कंपनी १ जीबी डेटा देते. ३०० फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल दिले जाते. याशिवाय, सब्सक्रायबर्सला विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिम अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेलचा १४९ रुपयांचा प्लान एअरटेलचच्या या प्लानमध्ये तुम्हाला एकूण २ जीबी डेटा दिला जातो. २८ दिवसांचा वैधतेसोबत या प्लानमध्ये ३०० फ्री एसएमएस आणि देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये अडिशनल बेनिफिट्स मध्ये ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल दिला जात आहे. याशिवाय, युजर्संना विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्सट्रिमचे फ्री अॅक्सेस दिले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wQv9dV