Full Width(True/False)

अर्जुनसोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचे उत्तर

मुंबई : अभिनेत्री ही सिनेमांपेक्षा तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. अलिकडे तर तिच्या आणि अर्जुन कपूरच्या अफेअरवरून दोघेही सातत्याने चर्चेत असतात. आता हे दोघे त्यांच्या लग्नाची तारीख कधी जाहीर करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मलायकाने अरबाज खानला २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर तिची आणि यांची मैत्री झाली आणि हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला त्यांनी आपले हे नाते सर्वांसमोर स्वीकारले नाही. परंतु २०१९ मध्ये त्यांनी आपले नाते जाहीरपणे कबूल केले. त्यानंतर या दोघांना सातत्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या दोघांच्या वयात असलेलेल अंतर. मलायका अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांहून मोठी आहे. सातत्याने याच मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने सणसणीत उत्तर दिले आहे. काय म्हणाली मलायका अरोरा तिच्या आणि अर्जुनमध्ये असलेल्या नात्यावरून आणि त्यांच्यातील वयातील अंतरावरून त्यांना सातत्याने ट्रोल केले जाते. वयाने मोठ्या आणि घटस्फोटीत महिलेचेही रिलेशन तिच्यापेक्षा लहान मुलाबरोबर असू शकते ही गोष्ट अजूनही समाजात स्वीकारली जात नाही. परंतु मलायकाने ही गोष्ट जाहीर केली आहे. त्यामुळे तिला सातत्याने ट्रोल केले जाते. अत्यंत असभ्य भाषेत तिच्यावर आणि अर्जुनवर टीका केली जाते. अर्थात या ट्रोर्लसना मलायाकाने कधीच फार महत्त्व दिलेले नाही. परंतु एका मुलाखतीमध्ये मलायकाने या मुद्द्यावर मोकळेपणाने मत व्यक्त केले. ती म्हणाली होती की,' कोणत्याही नात्यामध्ये तुमचे वय किती आहे, हे महत्त्वाचे नसते. परंतु आपल्या या समाजात अशा प्रकारचे नाते कधीच स्वीकारले जात नाही, कारण समाजाची मानसिकता अजूनही जुनीच आहे. एखाद्या पुरुषाचे त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीबरोबरचे संबंध हा समाज मान्य करतो. परंतु वयाने मोठ्या महिलेचे आणि तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलाचे नाते हाच समाज स्वीकारत नाही.' 'अशावेळी हा समाज त्या महिलेला दुषणे देतो, तिला उतावीळ म्हातारी म्हणतो... परंतु अशा विचारांच्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. त्यांना जे म्हणायचे आहे त्याने मला काही फरक पडत नाही.' यावेळी मलायकाने सांगितले की, तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल सर्वजण आनंदी आहेत. या नात्याला तिचा मुलगा अरहान यानेही मान्यता दिल्याचे तिने सांगितले. दरम्यान मलायका आणि अर्जुन या दोघांच्या लग्नाबद्दल अद्याप कोणतीही बातमी आलेली नाही. परंतु लवकरच ते आपल्या लग्नाबद्दल जाहीरपणे सांगतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a1ISop