Full Width(True/False)

तिनेही मला मारलं... अभिनवचे श्वेता तिवारीवर गंभीर आरोप, सांगितलं भांडणाचं कारण

मुंबई- मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तिच्या अभिनयाइतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. श्वेताने तिच्या पतीवर तिला मारहाण केल्याचे आरोप केले होते. तिने तिच्या मुलीने तिला मार खाताना पाहिल्याचं देखील म्हटलं होतं. श्वेताच्या या आरोपांवर तिच्या पतीने प्रतिउत्तर दिलं आहे. श्वेताचा पती याने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी श्वेताने देखील त्यांना मारल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, अडचणी तेव्हापासून सुरू झाल्या जेव्हापासून श्वेताच्या मोठ्या मुलीने पलकने त्यांच्यासोबत राहू शकत नसल्याचं म्हटलं. त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली आणि श्वेताने त्यांना त्यांच्या मुलालादेखील भेटू दिलं नाही. त्यांनी म्हटलं, 'मी श्वेताला कधीही मारलं नाही फक्त ती घटना सोडून जेव्हा मी तिला कानाखाली मारली होती. पण त्या गोष्टीसाठी मी त्या दोघींकडे अनेकदा माफी मागितली आहे. या सगळ्या गोष्टी श्वेताने मुद्दाम तयार केल्या आहेत जेणेकरून ती मला एक वाईट माणूस दाखवू इच्छिते. मी कधीही महिलांना मारणारा व्यक्ती नव्हतो.' याशिवाय त्यांनी श्वेताने त्यांना मारल्याच्या घटनेबद्दलही खुलासा केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्वेता त्यांना समाजासमोर पत्नीला मारणारा व्यक्ती दाखवू पाहतेय. पण तिनेही त्यांना वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी म्हटलं, '२०१७ साली आमचं भांडण झालं आणि ती आमच्या तीन महिन्यांच्या मुलाला घेऊन निघून गेली. त्यानंतर मी माझ्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला होता परंतु, श्वेताने मला छडीने मारलं होतं. मी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत माझ्या डोळ्याखाली काळा डाग दिसतोय. श्वेताने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मलापण मारण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं पण मी कुणाला मारलं नाही. पण हे खोटं आहे. तिने मला मारलं होतं आणि ते कुणाला कळालं नाही कारण मी मीडियासमोर गेलो नव्हतो.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dshh0C