नवी दिल्ली- सुपरस्टार यांना गुरुवारी जाहीर झाला. पुरस्काराची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी पत्रकार परिषदेत केली. या घोषणेनंतर तमिळनाडूमधील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे का असा प्रश्न जावडेकर यांना विचारला असता, ते संतापले आणि प्रश्न नीट विचारत जा असे प्रश्नकर्त्याला सुनावले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, हा सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. पाच लोकांची निवड समिती स्थापन करून त्यांनी एकत्रितपणे रजनीकांत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामध्ये राजकारण कुठून आले, त्यामुळे प्रश्न विचारताना नीट विचारत जा. याआधी जावडेकर यांनी रजनीकांत यांनी सिनेसृष्टीला जे योगदान दिले त्याबद्दल चर्चा केली. यावेळी जावडेकर म्हणाले, रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेजगतावर राज्य करत आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. याच कारणामुळे निवड समितीने रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या समितीमधील पाच लोकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात त्यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत राजकारणात येण्याचा निर्णय रद्द केला. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी रजनी मक्कल मण्ड्राम ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या तमिळनाडूमध्ये ६५,००० शाखा आहेत. याचेच रुपांतर रजनीकांत त्यांच्या राजकीय पक्षात करणार होते. परंतु ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे तमिळनाडूमधील अनेक राजकीय पक्ष रजनीकांत यांनी त्यांना समर्थन द्यावे, अशी अपेक्षा करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rKRtlf