Full Width(True/False)

अत्यंत गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्याला शशांक केतकरचं सडेतोड उत्तर

मुंबई:सोशल मीडियावर हल्ली कुणीही, कुणालाही वाट्टेल ते बोलून मोकळा होतो. सेलिब्रिटींना तर अनेकदा ऑनलाइन ट्रोलिंगना तोंड द्यावं लागतं. बहुतेकदा याकडे दुर्लक्ष केलं जात असलं, तरी आता मात्र काही सेलिब्रिटी या ट्रोलिंगला मुंहतोड जवाब देताना दिसतायत. अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यानंतर आता अभिनेता यानं अत्यंत गलिच्छ भाषेत मालिकेवर प्रतिक्रिया देण्याऱ्या एका युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. याबद्दल शशांकच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. गलिच्छ भाषा, शिवगाळ यांचा सतत भडीमार करणाऱ्यांना शशांकनं चांगलाच धडा शिकवलाय, असं चाहत्यांनी म्हटलं आहे. शशांक सध्या ''या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेट आहे. तो या मालिकेत खलनायकाची भूमिका करत असल्यानं काही चाहत्यांनी त्यांना हे आवडलं नसल्याचं म्हटलं आहे. तर एकानं गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिली होती. यानंतर शशांकनं त्याला सडेतोड उत्तर दिलं. आमच्या कलाकारांच्या भूमिकेबद्दल आणि या क्षेत्राची इतकीच काळजी वाटत असेल ,तुम्हीच्याकडे ऑस्कर विनिंग गोष्ट आणि त्याच्या निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अभिनय सुरू करा, असं शशांकनं त्या युझरला उत्तर देताना म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uaVGjP