मुंबई टाइम्स टीम सध्या राज्यातील लॉकडाउनमुळे मालिका, चित्रपट, जाहिरात आदींच्या चित्रीकरणासाठी परवानगी नाहीय. पण, मालिकांचं प्रक्षेपण रोज असल्यामुळे त्यांच्या चित्रीकरणात खंड पडू नये म्हणून बहुतांश हिंदी-मालिकांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणास सुरुवात केली. पण आता इतर राज्यांमध्ये करोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्यानं तेथेदेखील लॉकडाउन करण्याची वेळ आलीय. तिथे चित्रीकरण सुरू असलेल्या काही मालिकांनी बायो बबल या पर्यायाचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांना फारशा अडचणींना सामोरं जावं लागणार नाही असं जाणकार सांगतात. पण तरी त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह मात्र कायम असल्याचंही ते सांगतात. गोवा, हैदराबाद, , आग्रा आदी ठिकाणी सध्या चित्रीकरण करण्यात येत आहे. पण, आता गोवा, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मालिकांच्या टीमच्या चिंतेत भर पडली आहे. सद्यस्थितीत गोव्यात बऱ्याच हिंदी-मराठी मालिकांचं चित्रीकरण सुरु आहे. नुकतंच गोव्यामध्ये लॉकडाउन जाहीर केला असला; तरी मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी असल्याचं कळतं. तेथील सर्वच मालिका या 'बायो बबल' संकल्पनेत चित्रीकरण करत आहेत. बायो बबल म्हणजे कलाकार आणि संपूर्ण टीमला चित्रीकरणाची जागा आणि संबंधित हॉटेलच्या बाहेर कुठेही फिरण्याची परवानगी नाही. तसंच बाहेरील कोणतीही व्यक्ती कलाकारांना भेटू शकत नाही आणि सेटवरदेखील येऊ शकत नाही. तसंच संपूर्ण टीमची नियमित आरटीपीसीआर टेस्टदेखील करण्यात येते. नियम पाळून चित्रीकरण'पाहिले न मी तुला', 'अग्गबाई सुनबाई', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'रंग माझा वेगळा', 'गुम है किसी के प्यार में', 'आपकी नजरों ने समझा', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'ये हैं चाहतें' या मालिकांचं गोव्यात तर '' या मालिकेचं बेळगावमध्ये चित्रीकरण सुरु आहे. सध्या गोवा आणि कर्नाटकमध्ये लॉकडाउन असलं तरी; पूर्ण खबरदारी आणि तेथील राज्य सरकारच्या सर्व नियमांचं पालन करुन चित्रीकरण सुरु आहे. कलाकार सांगतात...आम्ही आता बेळगावमधील एका गावाच्या बाहेर चित्रीकरण करत आहोत. पूर्वीपेक्षा कमी युनिट असल्यामुळे कामाचा भार सगळ्यांमध्ये विभागला आहे. या सगळ्यामुळे एक वेगळी संस्कृती बघायला मिळतेय. चित्रीकरण करताना फार काही अडचणी येत नसून सर्व काही उत्तम प्रकारे सुरू आहे. करोनाविषयक सर्व नियमावलीनुसार चित्रीकरण सुरू आहे. गप्पा मारत एकत्र जेवण्याचा उत्तम अनुभव इथे घेता येतोय. - , 'देवमाणूस' (बेळगाव) आम्ही सगळेच काही दिवसांपूर्वी मालिकेच्या चित्रीकरणासाठी गोव्याला आलो आहोत. आमच्यापेक्षा लेखकांसाठी हा बदल फार आव्हानात्मक आहे. तसंच या निमित्तानं आम्ही सर्व जण दिवसभर एकत्र राहून काम करतो. चहा, नाश्ता, जेवण एकत्र करतो; त्यामुळे खूप वेगळं वाटतंय. - आशुतोष गोखले, 'रंग माझा वेगळा' (गोवा)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dZAnMT