Full Width(True/False)

चित्रपट फ्लॉप झाल्यावर लाखभर फी वाढवायचे राजकुमार, वाचा किस्सा

मुंबई- बॉलिवूड अभिनेते ७०- ८० च्या दशकातले अत्यंत गाजलेले अभिनेते होते. त्यांची अभिनयाची स्टाइल इतरांपेक्षा निराळी आणि हटके होती. त्यामुळे ते प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यावेळेस त्यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडावर असायचं. प्रेक्षक फक्त त्यांचा एक डायलॉग ऐकण्यासाठी संपूर्ण चित्रपट पाहायला येत असत. राजकुमार हे त्यांच्या अटी आणि नियमांवर चालणारे अभिनेते होते. त्यापुढे ते कुणाचाही विचार करत नसत. जर त्यांना चित्रपटात काम करणारा कोणता कलाकार आवडला नसेल तर ते चित्रपटच सोडून देत. त्यांनी कधीही कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्या स्वभावात बदल केला नाही. राजकुमार दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या तोंडावर त्यांच्या चित्रपटांना नकार देत. हे तर काहीच नाही पण त्यांच्या नियमांमध्ये एक आश्चर्य वाटण्यासारखा नियम होता. तो म्हणजे प्रत्येक फ्लॉप चित्रपटानंतर त्यांच्या मानधनात १ लाख रुपयांची वाढ करायचे. अनेकांना त्यांच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलं होतं. भलेही त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट फ्लॉप ठरला असेल तरीही ते त्यांच्या मानधनात वाढ करत असत. एका मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट चाहत्यांना सांगितली होती. ते म्हणाले, 'जेव्हा माझे चित्रपट फ्लॉप व्हायचे मी माझ्या चित्रपटाच्या मानधनात १ लाखाची वाढ करायचो. माझ्या सेक्रेटरीने एकदा मला विचारलं होतं की राज सर, चित्रपट तर फ्लॉप झाला. तरीही तुम्ही १ लाख मानधन वाढवताय? मी तिला उत्तर दिलं की, 'चित्रपट भलेही न चालूदे, पण मी फ्लॉप नाही झालो. म्हणून मी माझं मानधन १ लाखाने वाढवलं.' राजकुमार यांच्यामते ते कोणताही चित्रपट करत, त्यातील भूमिका ते खूप चांगल्या प्रकारे करत. त्या भूमिकेला ते न्याय देत. त्यामुळे त्यांनी स्वतःला कधीही फ्लॉप अभिनेत्यांमध्ये पाहिलं नाही. जेव्हा बॉलिवूडमध्ये दिलीप कुमार, राजेश खन्ना, राज कपूर आणि देव आनंद यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. त्यावेळेसही राजकुमार यांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या कठोर स्वभावामुळे अनेकदा दिग्दर्शक आणि निर्माते नाराज होत असत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3duKbyr