Full Width(True/False)

5000mAh बॅटरीसोबत Oppo A54 स्मार्टफोन भारतात लाँच, खरेदीवर १००० रुपयांची सूट

नवी दिल्लीः ओप्पोने 5000mAh बॅटरीचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनचे नाव Oppo A54 आहे. फोनची किंमत १३ हजार ४९० रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा पंच होल डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स मिळणार आहेत. याशिवाय, स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरासोबत येतो. या फोनची विक्री २० एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः OPPO A54 ची किंमत आणि ऑफर्स स्मार्टफोनला तीन स्टोरेज ऑप्शन मध्ये आणले आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB स्टोरेजची किंमत १३ हजार ४९० रुपये आहे. तर 4GB + 128GB व्हेरियंटची किंमत १४ हजार ४९० रुपये आहे. याच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या टॉप मॉडलची किंमत १५ हजार ९९० रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते. वाचाः OPPO A54 चे फीचर्स या फोनमध्ये ६.५१ इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. जो एचडी प्लस रिझॉल्यूशन (720 x 1600 पिक्सल्स) सोबत येतो. सेल्फी कॅमेरा साठी यात पंच होल डिझाइन दिली आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर सोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकचे फीचर दिले आहे. वाचाः या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो फ्रंट कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3suQW7I