Full Width(True/False)

करोनातून ठीक होताच आलिया-रणबीर निघाले मालदीवला, फोटो व्हायरल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अशा सेलिब्रेटींपैकी आहेत. ज्यांना करोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलिया करोनातून मुक्त झाले आहेत आणि आता करोना व्हायरसपासून दूर आता मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रवाना झाले आहेत. या दोघांचे एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलिया आणि रणबीर यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात ते दोघंही एअरपोर्टवर कारमधून उतरताना दिसत आहे. सूत्राच्या माहितीनुसार हे दोघंही मालदीवसाठी रवाना झाले आहेत. या दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्र सरकारनं १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फक्त रणबीर आलियाच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार मालदीवला रवाना झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. मागच्या महिन्याभरात बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, आमिर ख़ान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आर माधवन, तारा सुतारिया, कार्तिक आर्यनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sxBTdj